Vidhan Parishad Election : ठाकरेंचा अचानक मोठा निर्णय! उमेदवार घेतला मागे

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२४

point

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक

point

किशोर जैन यांची उमेदवारी ठाकरेंनी घेतली मागे

Uddhav Thackeray Maha Vikas Aghadi : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कुरबुरी होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभी ठाकल्याचे स्थिती निर्माण झाली होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी एका जागेवरून उमेदवार मागे घेतला आहे, तर काँग्रेसनेही एका मतदारसंघातून माघार घेतल्याने महाविकास आघाडीतील जागांबद्दलचा कलह शमल्याचे दिसत आहे. (Uddhav Thackeray has withdrawn the candidature of Shiv Sena candidate Kishore Jain from Konkan Graduate Constituency)

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. 26 जून रोजी मतदान होत असून, आज (12 जून) उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने चारही मतदारसंघातून उमेदवार दिले. तर काँग्रेसने कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिले होते. 

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार

कोकण पदवीधर मतदारसंघ

निरंजन डावखरे (भाजप) 
किशोर जैन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 
रमेश कीर (काँग्रेस) 
संजय मोरे (शिवसेना) 
अमित सरैय्या (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

हे वाचलं का?

मुंबई पदवीधर मतदारसंघ

किरण शेलार (भाजप) 
अनिल परब (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
दिपक सावंत (शिवसेना)

हेही वाचा >> सुनेत्रा पवार खासदार होणार? राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

मुंबई शिक्षक मतदारसंघ

शिवनाथ दराडे (भाजप) 
ज. मो. अभ्यंकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवाजीराव नलावडे (राष्ट्रवादी काँग्रेस) 
सुभाष मोरे (शिक्षक भारती)

ADVERTISEMENT

नाशिक शिक्षक मतदारसंघ

किशोर दराडे  (शिवसेना )
महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस )
संदीप गुळवे  (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
दिलीप पाटील (काँग्रेस)

ADVERTISEMENT

 

ठाकरेंच्या शिवसेनेने कोकण पदवीधरमधून उमेदवार घेतला मागे

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चारही मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेली काँग्रेस नाराज झाली होती. काँग्रेसने ठाकरेंना कोकण आणि नाशिकमधील उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती.

हेही वाचा >> "....तर पंतप्रधान मोदी 2 ते 3 लाख मतांनी हरले असते" 

उद्धव ठाकरेंची शिवसेना माघार घेणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. अखेर ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार मागे घेतला आहे. किशोर जैन यांची उमेदवारी मागे घेण्यात आली असून, काँग्रेसने शिक्षक मतदारसंघातून दिलीप पाटील यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद तूर्तास तरी मिटल्याचे दिसत आहे. 

दुसरीकडे महायुतीमध्येही जागावाटपावरून संघर्ष आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे हे रिंगणात आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत हे उमेदवार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवार शिंदे मागे घेणार का? हेही महत्त्वाचे आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT