Sanjay Shirsat: सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय शिरसाट 'हे' काय बोलून गेले
Sanjay Shirsat On Shivsena Unity : शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिंदेच्या शिवसेनेची आणि ठाकरे गटाची युती होणार?

"भविष्यात तुम्ही एकत्र येणार का? आलात तर..."

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat On Shivsena Unity : 21 जानेवारी 2022 ला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर उद्धव ठाकरेंना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. शिंदे शिवसेनेच्या जवळपास 50 आमदारांनी सोबत घेऊन गुवाहाटीला गेले आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. तेव्हापासून शिवसेनेत उभी फूट पडली आणि दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या. अशातच शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिलीय.
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
शिवसेना फुटल्याचं तुम्हाला दु:ख झालं आता तुम्ही शिवसेना पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, हे खरं आहे का? यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट म्हणाले, मी जे काही बोललो त्यावरून मी मागे हटणार नाही. मी जे बोललो ते सत्य आहे. शिवसेना फुटल्याचं दु:ख आजही मला आहे. त्याचे दोन तुकडे व्हायला नको होते. कारणं काय आहेत, हे सर्वांना माहित आहे. भविष्यात तुम्ही एकत्र येणार का? आलात तर आनंद होईल, असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
हे ही वाचा >> "...याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना", बजेट घोषित केल्यानंतर CM फडणवीस काय म्हणाले?
परंतु, त्यासाठी मी काही प्रयत्न करणार आहे आणि माझ्यामुळे ते दोन्ही एकत्र येतील, असं समजण्याचं काहीच कारण नाही. मी हे ही सांगितलं की, त्यांची जी काही हटवादी भूमिका आहे, पक्ष संपला तरी चालेल पण भूमिका सोडायला तयार नाहीत. त्यांनी एकत्र यायचं की नाही, शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यायचा, उद्धव साहेबांनी काय निर्णय घ्यायचा? यामध्ये मी कोणता विद्वान आहे. जी घटना घडेल, त्याचा आनंद निश्चित असेल. परंतु, मी त्यासाठी काही प्रयत्न करेल, असं समजण्याचं काही कारण नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.
हे ही वाचा >> Union Budget 2025: काय स्वस्त, काय महाग... बजेटमधून नेमकं काय मिळणार?
दरम्यान, सासवडमध्ये शिवसेनेची आभार सभा नुकतीच पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. शिंदे जनतेला संबोधीत करताना म्हणाले होते, "तुम्ही महायुतीवर, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं आणि तुमचे आशिर्वाद सदैव पाठिशी राहतील, पाठिशी ठेवा. तुम्ही विधानसभेत जसा विश्वास दाखवला, तसा कायम विश्वास दाखवा. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही, हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. काय विरोधकांची हालत झाली आहे. युद्धातही हरले आणि तहातही हारले. ज्या महाराष्ट्र द्रोह केला, त्यांना पुरंदर अशीच शिक्षा देतो."