Santosh Bangar : "गद्दारी गद्दारी म्हणतो, तुमच्या तर थोबाडात मारलं पाहिजे", संतोष बांगर यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

मुंबई तक

Santosh Bangar On Eknath Shinde And Sharad Pawar:  शरद पवार यांच्याहस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या कामकाजाचं कौतुक केलं.

ADVERTISEMENT

Santosh Bangar On Sanjay Raut
Santosh Bangar On Sanjay Raut
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांनी DCM एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक

point

संतोष बांगर यांनी संजय राऊतांना थेट सुनावलं

point

"गद्दारी गद्दारी म्हणतो, तुला आता लोकांनी दाखवलं..."

Santosh Bangar On Eknath Shinde And Sharad Pawar:  शरद पवार यांच्याहस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या कामकाजाचं कौतुक केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शिंदे-पवार एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलंय. अशातच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. बांगर म्हणाले, "मला वाटतं, जो काम करत असतो, त्याचं कौतुक होत असतं. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी महाराष्ट्रानं आणि संपूर्ण भारत देशानं काम बघितलं आहे. त्यांचं जर कौतुक शरद पवार साहेब करत असतील, तर मला वाटतं कौतुकाची थाप शिंदे साहेबांना मिळाली आहे. शरद पवारांनी गद्दारी करणाऱ्या शिंदेंचा सन्मान करायला नको होता, आधी पाहायला पाहिजे होतं, संजय राऊतांच्या या प्रतिक्रियेवर बांगर म्हणाले, गद्दारी गद्दारी म्हणतो, तुला आता लोकांनी दाखवलं की..कोण गद्दार आहे आणि कोण नाही..गद्दार जर असते तर 60 आमदार निवडून आले असते का? खरी गद्दारी तुम्ही केली. शरद पवार साहेबांना आता हे लेट समजलं. शरद पवार साहेबांनी चांगल्या माणसाच्या पाठीवर थाप दिली".

संजय राऊत यांच्यावर टीका करत संतोष बांगर पुढे म्हणाले, "तुमच्या तर थोत्रीत (थोबाडात) हाणायला पाहिजे..अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो. शरद पवार साहेबांना समजलंय की महाराष्ट्राचं नाव ज्यांनी गाजवलं ते एकमेव बाळासाहेब ठाकरे होते. संयमी राजकारणी..महाराष्ट्रात कुणाचा नाव आणि चेहरा येत असेल, तर तो मला वाटतं शरदचंद्रजी पवार साहेबांचा येतो. शरद पवार साहेब सोपा माणूस नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जसं शिवसेना नावाचं रोपटं लावलं..आज संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर संपूर्ण जगात नाव गाजतंय. त्याच पद्धतीचं काम शरद पवार साहेबांचं या महाराष्ट्राने बघितलं आहे".

हे ही वाचा >> Krishnaraaj Mahadik: रिंकू राजगुरुचं महाडिकांच्या 'परशा'शी होणार लग्न? खुद्द कृष्णराज महाडिकांनी सांगितली Inside Story

भविष्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचे राजकारणात सूत जुळतील का? काय चर्चा सुरु आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना बांगर म्हणाले, "मी फार छोटा कार्यकर्ता आहे. उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे आणि ते वरिष्ठ पातळीवरचे निर्णय घेतील. बाकी आपण काहीच करू शकत नाही. त्यांनी महाराष्ट्र चालवला आहे. आपण आज उघड्या डोळ्याने बघतोय की, या महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ भाई शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलो तर त्याठिकाणी फक्त एकनाथ भाई हाच चेहरा समोर येतो". उद्धव ठाकरेंनी एकला चलो रे भूमिका घेतल्यानंतरच शरद पवार एकनाथ शिंदेंशी जवळीक साधत आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, यावर बोलताना संतोष बांगर म्हणाले, शिंदे साहेब आणि शरद पवार साहेब हे फार मोठे नेते आहेत. त्यांचे विचार आपण बघू शकतो.

हे ही वाचा >> Nitesh Rane : "राज्यातील मदरसे अतिरेक्यांचे अड्डे...", पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणेंची खळबळजनक माहिती


 

हे वाचलं का?

    follow whatsapp