Aditya Thackeray : "लाडक्या बहिणींना 2100 रुपये...", सरकारवर हल्लाबोल करत आदित्य ठाकरे काय म्हणाले?
Aditya Thackeray Press Conference : "आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे पत्र लिहिले आहे. ते मुख्यमंत्र्यांना, सत्ताधारी पक्षांना दिलं आहे. ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आम्ही या पत्रात केलेला आहे, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषेदत सरकारचा घेतला समाचार

लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Aditya Thackeray Press Conference : "आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे पत्र लिहिले आहे. ते मुख्यमंत्र्यांना, सत्ताधारी पक्षांना दिलं आहे. ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आम्ही या पत्रात केलेला आहे, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही? आम्ही एवढ्या छोट्या मनाचे किंवा विचाराचे नाही आहोत की, एखाद्या पदावरून किंवा एखाद्या बसण्याच्या जागेवरून वाद विवाद करू. पण हे जे विषय मी मांडलेले आहेत, हे जनतेचे विषय आहेत. समाजाचे विषय आहेत. मग कायदा सुव्यवस्थेचा विषय असो, महिला सुरक्षेचा विषय असो, पुरुषांचा किंवा लहान मुलांचा विषय असो..शेतकऱ्यांचे सायाबिनचे, कापसाचे विषय..आज अनेक विषय या महाराष्ट्रात आहेत. अनेक मंत्र्यांना दोषी ठरवलेलं आहे. सत्ताधारी नसलेल्या पक्षात जशी कारवाई होते, तशी कारवाई सत्ताधारी पक्षांवर किंवा त्यांच्या लोकांवर का नाही होत? हा प्रश्न आज महाराष्ट्रासमोर उपस्थित झाला आहे", असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
लाडकी बहीण योजनेबाबत आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हणाले, "ईव्हीममुळे, निवडणूक आयोगाच्या आशिर्वादामुळे तुमचं बहुमताचं सरकार आलंय. पण ज्या महाराष्ट्रातून तुम्ही निवडून आला. ज्या महाराष्ट्राची सत्ता काबिज करून बसला आहात, त्याची कामे तुम्ही करणार आहेत की नाही? जी वचनं तुम्ही जाहीरनाम्यात दिली, त्याची वचनपूर्ती करणार आहात की नाही? लाडक्या बहिणींना पैसै वाढवून देणार होते. 2100 रुपये देणार होते. ते सुरु झालंय की नाही, अजूनही माहित नाही. आम्ही तर वाढवून देणारच होतो. महिला सुरक्षाही स्थापित करणार होतो. तोच शक्ती कायदा राष्ट्रपतींनी परत मागे केला, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला".
हे ही वाचा >> Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, सुरक्षारक्षकाला कॉलर धरून धक्काबुक्की, प्रकरण काय?
"दिल्लीत 2500 देणार होते. पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार होते. मंत्रिमंडळाची बैठक होऊन गेली. पण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं उत्तर तुम्ही पाहिलं. आमचं सरकार आलंय, आम्ही पाहिजे ते करू. तुम्ही कोण प्रश्न विचारणारे..ही जी आणीबाणी दादागिरी चालते, हा माज या सत्ताधारी पक्षाला आलेला आहे. त्याच्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. कोणत्याही पदाचा, खुर्चीचा इथे उल्लेख नाही. पद येत जात असतात. आज ते सत्तेत आहेत. उद्या आम्ही असू. पण सत्ताधारी पक्षात पालकमंत्री, बंगले कोणाला मिळणार, अशी भांडणं सुरु झाली आहेत", असंही आदित्य ठाकरे म्हणाले.