Sanjay Raut: "एकनाथ शिंदे भाजपसमोर सरपटणारं प्राणी...", संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

मुंबई तक

Sanjay Raut On Eknath Shinde:  "मी सामन्यात रोखठोकमध्ये एक विषय मांडलेला आहे. हा विषय सर्वांनाच माहिती आहे. महाराष्ट्रातलं सरकार बहुमतातलं असलं, तरी ते एकसंध नाही, त्यात एक वाक्यता नाही".

ADVERTISEMENT

Sanjay Raut vs Eknath Shinde
Sanjay Raut vs Eknath Shinde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

point

"एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न..."

point

संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Sanjay Raut On Eknath Shinde:  "मी सामन्यात रोखठोकमध्ये एक विषय मांडलेला आहे. हा विषय सर्वांनाच माहिती आहे. महाराष्ट्रातलं सरकार बहुमतातलं असलं, तरी ते एकसंध नाही, त्यात एक वाक्यता नाही. एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद, ज्याला आपण बार्गेनिंग पावर म्हणतो,ती भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे संपवली असल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांचं गट भाजपसमोर सरपटणारं प्राणी झालं आहे. हे आज स्पष्ट दिसतंय", असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

संजय राऊत शिंदेवर टीका करत पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदे खासगीत सांगतात, विधानसभा निवडणुकीतनंतर मीच मुख्यमंत्री राहीन, अशाप्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी सुटलो. 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात, हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांचं म्हणणं आहे. त्यांना जाऊन विचारा. मी खोटं बोलत नाही. निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदेंना बाजूला केलं. काही मंत्रिपदं दिली, काही खातं दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं. पण एकनाथ शिंदेंचा आपण चेहरा पाहिला असेल. त्यांचे हावभाव पाहिल्यावर तुम्हाला कळेल की, ते अजूनही शुन्यात आहे की गुंगीत आहेत. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. एकतर त्यांना 50-55 जागा कशा मिळाल्या, हा त्यांना पहिला धक्का. दुसरं म्हणजे भाजपने, अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला नाही, हा दुसरा धक्का. त्या धक्क्यातून ते पूर्णपणे कोलमडले आहेत".

हे ही वाचा >> नाशिकजवळ भीषण अपघात, 200 फूट खोल दरीत बस कोसळून 7 जणांचा मृत्यू

"सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे. सरकारमध्ये चार-दहा लोकांना मंत्रिपद असणं म्हणजे मान आणि प्रतिष्ठा असणं असं नाही. मुख्यमंत्री म्हणून जो फोकस त्यांच्यावर होता तो गेला. लोक त्यांच्याकडे जात नाहीत. लोकं जातात ते फक्त पैसे मागायला जातात. कारण त्यांच्याकडे पैसे आहेत. यापुढे त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता त्याच्यावरच चालेल. त्यांच्याच आमदारांमध्ये चलबिचल आहे. आहे की नाही, तुम्ही जाऊन प्रत्येकाला विचारा. मी कशाला सांगायला पाहिजे. त्यांच्या एका गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्णपणे नियंत्रण आहे.

हे ही वाचा >> GB Syndrome: महाराष्ट्राची चिंता वाढली, GBS मुळे 5 जणांचा मृत्यू, पुण्यात सर्वाधिक रुग्ण

शिंदे गटातील किमान 20-25 आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण नियंत्रण आहे. कारण हे आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. एकनाथ शिंदेंसाठी नाही. आजही त्यांच्यावर फडवीसांचं नियंत्रण आहे. उरलेले लोक आहेत ते चंचल आहेत. त्यांना असं वाटतंय की आपली कोंडी होतेय. भविष्यात जास्त कोंडी होईल. आपल्याला कोणतंही चांगलं नेतृत्व नाही. जे आपल्याला संरक्षित करेल. तेव्हा आपण मागे फिरायचं का, असा विचार पक्षात सुरु आहे. ही माझी माहिती आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp