Shweta Shalini : भाऊ तोरसेकरांना पाठवलेली कायदेशीर नोटीस भाजपने का घेतली मागे?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

shweta shalini notice withadraw senior journalist bhau torsekar bjp maharashtra devendra fadnavis
श्वेता शालिनी यांनी एक्सवर ट्विट करून भाऊ तोरसेकर यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती दिली होती.
social share
google news

Shweta Shalini Withdraw Notice : भाजपच्या मीडिया प्रभारी श्वेता शालिनी (Shweta Shalini) यांनी आज जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर (bhau torsekar) आणि चेतन दीक्षित यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचा मीडिया सेल कसा अपयशी ठरला होता? यावर भाष्य करणारा भाऊ तोरसेकर यांनी व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ शालिनी यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी संतापून भाऊ तोरसेकरांना कायदेशीर नोटीस बजावली होती. मात्र आता हीच नोटीस मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (shweta shalini notice withadraw senior journalist bhau torsekar bjp maharashtra devendra fadnavis) 

श्वेता शालिनी यांनी एक्सवर ट्विट करून भाऊ तोरसेकर यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडिया श्वेता शालिनी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. तसेच भाजपातील वरीष्ठ नेत्यांकडून देखील त्यांना समज देण्यात आला होता. त्यानंतर श्वेता शालिनी यांनी कायदेशीर नोटीस मागे घेतली आहे. याशिवाय श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांची माफी देखील मागितली आहे.  

हे ही वाचा : Budget 2024: पंतप्रधान मोदींचं ब्रम्हास्त्र, संपूर्ण गेमच पलटणार?

श्वेता शालिनी यांचं ट्विट जशाच तसं

आदरणीय भाऊ तोरसेकर,

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपण माझ्या विषयी नुकताच एक व्हिडिओ बनवला. तुमची प्रतिमा एक ज्येष्ठ सुजाण पत्रकार अशी माझ्या मनात आहे आणि एक स्पष्ट वक्ता पत्रकार म्हणून मला आपल्याविषयी प्रचंड आदर आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता तुम्ही मला ओळखत नाही, कधी भेटला नाही. मग काही मोजक्या लोकांच्या ऐकण्यावरून कोणतीही शहानिशा न करता माझ्याविषयी व्हिडिओ बनवणे तुमच्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराकडून अपेक्षित नव्हते. माझी बाजू समजून न घेता तुमच्यासारख्या प्रतिभावंत पत्रकाराने कोणाच्या सांगण्यावरून एकतर्फी व्हिडिओ बनवणे याची मला अपेक्षा नव्हती; याच दुःखातून मी आपणास एक लीगल नोटीस हि पाठवली. 

फक्त आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत माझ्याकडे मीडिया आणि जाहिरात किंवा कोणत्याही प्रकारचे काम कोणत्याही कंपनीला देण्याचे कोणतेही अधिकार नव्हते. त्यामुळे कोणालाही मदत करणे विशेष करून विरोधी विचारसरणीच्या लोकांना मदत करणे तर शक्यच नाही. आपणस कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि त्यातून हा प्रकार घडला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : महायुतीत बिघाडी? अजित पवार गटाचा चंद्रकांत पाटलांवर थेट हल्ला

पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून याची तक्रार मी वरीष्ठ नेतृत्वाकडे केली आणि त्यांनी एक समिती बनवून या खोटी माहिती देण्याविषयी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मला दिले. माझी आपणास एवढीच विनंती आहे कि ज्या लोकांनी आपणास चुकीची माहिती देऊन माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांची नावे वरिष्ठ लोकांकडे देण्याचे सहकार्य आपण कराल. 

ADVERTISEMENT

पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून मला असे वाटते कि यावेळी आपसात न भांडता २०२४ च्या लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या सुधारून २०२४ च्या विधानसभेसाठी आपण काम करावे आणि त्या कामात आपल्या सारख्या वरिष्ठ व्यक्तीच्या मार्गदर्शनाची मोठी भूमिका आहे. आपणाशी माझा कोणताही हि व्यक्तीगत वाद नाही. त्यामुळे मी आपणस पाठवलेली लीगल नोटीस वापस घेत आहे. तसेच लवकरच प्रत्यक्ष भेटून जो काही आपला गैरसमज झाला तो दूर करून आपण सोबत कार्य करू अशी अपेक्षा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT