Nagpur Violence: औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरमध्ये मग नागपूर अचानक का पेटलं?
औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी यासाठी नागपूरमध्ये निदर्शनं झाली. त्याचवेळी संध्याकाळी अचानक नागपूरमध्ये हिंसाचार पेटला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
ADVERTISEMENT

Nagpur Riots: नागपूर: औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादात, सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील नागपूरमधील महाल परिसरात दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यावेळी, हल्लेखोरांनी अनेक वाहने पेटवून दिली. त्यांनी दगडफेक केली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली. दगडफेकीत अनेक पोलिसही जखमी झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, प्रशासनाने कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये असे म्हटले आहे.
नागपूर का पेटलं?
मुस्लिम संघटनांनी दावा केला होता की, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलासह काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी निषेधादरम्यान धार्मिक संदेश लिहिलेले कापड जाळले होते. संभाजीनगरमधील मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी काही चादरी जाळण्यात आल्या. ज्यावर कलमा लिहिलेला होता. दरम्यान, यानंतर अचानक परिसरात दगडफेक आणि जाळपोळ झाली.
हे ही वाचा>> Nagpur मध्ये अचानक का भडकली एवढी हिंसा? घटनेची A to Z स्टोरी
अखेर मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आता स्थानिक प्रशासनाने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
नागपूरमधील हिंसक संघर्षांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही सतत पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं. असे आवाहन केले आहे.
केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी म्हणाले की, 'काही अफवांमुळे नागपुरात धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा बाबींमध्ये शांतता राखण्याचा शहराचा इतिहास आहे. मी माझ्या सर्व बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखण्याचे आवाहन करतो. रस्त्यावर उतरू नका, कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य करा. नागपूर ज्या शांतता आणि सौहार्दासाठी ओळखले जाते ती परंपरा कायम ठेवा.'
हे ही वाचा>> Big Breaking: CM फडणवीसांच्या नागपुरात दोन गटात तुफान राडा, दगडफेक आणि जाळपोळ
'मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की, ज्यांनी चूक केली आहे किंवा बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. मुख्यमंत्र्यांना या परिस्थितीबद्दल आधीच माहिती देण्यात आली आहे, म्हणून मी सर्वांना विनंती करतो की अफवांवर लक्ष देऊ नका. कृपया पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, प्रेम पसरवा आणि शहरात सकारात्मक वातावरण राखा. ही माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे.'
दरम्यान, हिंसाचर सुरू होताच हिंसक जमावाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आणि वाहनांना आग लावण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये जळती वाहने आणि परिसरात दगडांचा खच दिसून आला. हिंसाचार थांबवण्यासाठी आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी संघर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आणखी वातावरण आणखी चिघळू नये म्हणून अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.