Sukhbir Singh Badal attack : सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा पाकिस्तानातून आला? कोण आहे नारायणसिंग?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला

point

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरातील घटना

पंजाबमधील अमृतसरमध्ये असलेला सुवर्ण मंदिर परिसर आज सकाळी गोळीबाराने हादरला. सुवर्ण मंदिराच्या परिसरातच माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल थोडक्यात बचावले. शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल सध्या धार्मिक शिक्षा भोगत असून, ते सुवर्ण मंदिरात पहारा देत असताना, सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर ही घटना घडली. सुखबीर सिंग यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे, त्यामुळे ते व्हीलचेअरवर बसून हातात भाला घेऊन पहारा देत होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Sukhbir Singh Badal attack Video : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार, सुवर्ण मंदिराच्या गेटवरच...

हल्लेखोर हातात पिस्तुल घेऊन आला आणि त्याने सुखबीर सिंग यांना लक्ष्य करत गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं हल्लेखोराचा हात धरला आणि एक गोळी हवेत फायर झाली. जमावाने हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येत आहे. हल्लेखोराने आपलं नाव नारायण सिंह चौरा असल्याचं सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 'बब्बर खालसा' संघटनेशी संबंधित असून तो पाकिस्तानातही जाऊन आलेला आहे.

कोण आहे नारायण सिंह?

हे ही वाचा >>Maharashtra New CM LIVE Updates : शपथविधीची तयारी, महायुतीच्या बैठकांचा धडाका, मुख्यमंत्री कोण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर नारायण सिंह चौरा हा 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' या संघटनेचा (BKI) दहशतवादी आहे. नारायण चौरा 1984 मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि दहशतवादाच्या सुरुवातीच्या काळात पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करण्यात त्याचा हात होता. पाकिस्तानमध्ये राहून त्यांने गोरिल्ला युद्धनिती आणि देशद्रोहाशी संबंधीत एक पुस्तकही लिहिलं आहे. 'बुडैल जेलब्रेक' प्रकरणातीलही तो आरोपी आहे. नारायण याने यापूर्वी काही प्रकरणांमध्ये पंजाबमधील तुरुंगात शिक्षाही भोगली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT