'ठाकरे हे शरद पवार, आशा भोसलेंना पण गद्दार बोलतील...' शिंदेंच्या मंत्र्याची जहरी टीका
शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पाहा पत्रकारांशी बोलताना ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: 'उद्या ठाकरे शरद पवारांना गद्दार बोलायला हे कमी करणार नाही, आशा भोसलेंना गद्दार बोलायला कमी करणार नाहीत.' अशी जहरी टीका शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. काल (11 फेब्रुवारी) एका सत्कार सोहळ्यात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं. तर दोन दिवसांपूर्वी आशा भोसलेंनी शिंदेंचं कौतुक केलं होतं. ज्यावर रश्मी ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. यावरच आता संजय शिरसाटांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
प्रश्न: आशा भोसले यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर 'मातोश्री' नाराज असल्याचं बोललं जात आहे. असंही समजतंय की, स्वत: रश्मी ठाकरेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
संजय शिरसाट: उद्या शरद पवारांना गद्दार बोलायला हे कमी करणार नाही, आशा भोसलेंना गद्दार बोलायला कमी करणार नाहीत. यांच्या विरोधात कोणी काही कार्यक्रम केला तर प्रत्येकाला गद्दार हा शब्द चिकटविण्याची यांच्याकडे स्पर्धा लागली आहे.
हे ही वाचा>> Santosh Bangar : "गद्दारी गद्दारी म्हणतो, तुमच्या तर थोबाडात मारलं पाहिजे", संतोष बांगर यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका
चांगल्या माणसाने चांगलं काम करणं त्यांना आवडत नाही. आशा भोसलेंसारख्या ज्येष्ठ गायिका जेव्हा कार्यकर्त्याचं पोटभर कौतुक करतात त्यावेळेस आपला शिवसैनिक कोणत्या स्तराला गेलाय याचा अभिमान वाटण्यापेक्षा त्यांच्यावरही टीका करतात.
म्हणून आता त्यांच्यापासून जे दूर जातील ते सगळे यांच्या नजरेत गद्दार आहेत. म्हणून शरद पवार साहेबांवर गद्दारीचा शिक्का लागलेला आहे की काय? असा एक प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. असं म्हणत संजय शिरसाटांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर जोरदार टीका
दरम्यान, याचवेळी संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवरही टीका केली. 'राजकारणातील हा खलनायक ज्याला खऱ्या अर्थाने शकुनी म्हणता येईल हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे आणि या संजय राऊतमुळेच सगळं घडलंय.'
हे ही वाचा>> Sanjay Raut : "पवारांकडून शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार, आम्हालाही राजकारण कळतं"
'अहो या संजय राऊतला कधी तरी साहित्य संमेलन कळालयं का? सामनामध्ये येण्यापूर्वी नागडे-उघडे फोटो छापणारा हा पत्रकार हा आता इतरांवर टीका करायला लागलाय. खऱ्या अर्थाने याला जोडे मारले पाहिजे.'
'खानदानी असावं लागतं.. एकनाथ शिंदे साहेब हे खानदानी आहेत खानदानी... शिवसेनाप्रमुखांचे विचार ताकदीने पेलणारा तो नेता आहे. याची जाणीव शरद पवार साहेबांना सुद्धा आहे. म्हणून एखाद्या बद्दल चांगल्या पद्धतीने वक्तव्य करणं हा शरद पवारांना मिळालेला बहुमान आहे. म्हणून या इतरांची आम्ही चिंता करत नाहीत. तुम्ही फक्त दलाली करणं. एवढंच काम संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला राहिलं आहे.' असं ते म्हणाले.