Mazi ladki bahin yojana: झटपट भरा फॉर्म, अर्ज भरण्याची 'ही' आहे शेवटची तारीख!
Majhi ladki bahin yojana apply last date: जाणून घ्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख नेमकी काय आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माझी लाडकी बहीण योजनेविषयी जाणून घ्या
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची शेवटची तारीख कोणती?
अर्जाची मुदत सरकारने वाढवली
Majhi ladki bahin yojana last date to apply: मुंबई: महाराष्ट्रात सध्या माझी लाडकी बहीण या योजनेची जोरदार चर्चा आहे. कारण यामध्ये महिलांना प्रतिमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अक्षरश: झुंबड उडाली आहे. त्यामुळे आता या योजनेचा लाभा घेण्यासाठी मुदत वाढवण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. तसेच त्याबाबतचा उल्लेख सुधारित जीआरमध्ये देखील करण्यात आला आहे. (to avail mazi ladki bahin yojana quickly fill the form 31st august 2024 is the last date to apply)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. आता लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या योजनेला लाभार्थी महिलांचा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.
हे ही वाचा>> Mazi Ladaki Bahin Yojana: 1500 रुपये कधी मिळणार? अजितदादांनी तारीखच सांगून टाकली!
जेव्हा माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हा अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै ते 15 जुलै अशी होती परंतु आता ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ सहज मिळावा, यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही बदलही करण्यात आले असून, अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत.
हे वाचलं का?
जुलै महिन्यापासून संपूर्ण राज्यात ही योजना शासनाकडून लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला जुलै 2024 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतील. ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध असल्याने महिलांना घराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, त्यांना घरी बसून अधिकृत वेबसाइट आणि App द्वारे सहज अर्ज करता येणार आहे.
हे ही वाचा>> PCMC मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी! लगेच करा अर्ज
सुधारित जीआरमध्ये नेमकं काय केलंय नमूद?
योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा:
ADVERTISEMENT
सदर योजनेत आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31. ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.
ADVERTISEMENT
योजना कधी सुरू झाली - |
28 जून 2024 |
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली- |
1 जुलै 2024 |
आधी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय होती- |
15 जुलै 2024 |
जुने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे - |
31 ऑगस्ट 2024 |
पैसे कधीपासून मिळणार - |
सप्टेंबर 2024 पासून |
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT