Maharashtra Bandh: उद्धव ठाकरे उद्या स्वत: चौकात जाऊन बसणार, ठाकरेंची एक घोषणा अन्...

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे उद्या स्वत: चौकात जाऊन बसणार
उद्धव ठाकरे उद्या स्वत: चौकात जाऊन बसणार
social share
google news

Uddhav Thackeray: मुंबई: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विरोधकांकडून उद्या (24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. ज्यावर आज (23 ऑगस्ट) कोर्टाने अशा प्रकारचा बंद करण्यास मनाई केली. ज्यानंतर महाविकास आघाडीने बंद मागे घेतला. पण असं करताना शिवेसना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक अशी घोषणा केली की, आता या सगळ्याचं चित्रच पालटून गेलं आहे. (uddhav thackeray himself will sit in the square a big announcement made while withdrawing the maharashtra bandh shiv sena ubt badlapur school case)

महाराष्ट्र बंदला कोर्टाने मनाई केल्यानंतर सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस (SP)चे शरद पवार यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि शिवसेना (UBT) पक्षाने देखील बंद मागे घेत असल्याची घोषणा केली.

हे ही वाचा>> Maharashtra Bandh : 'उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घ्या', पवारांनी अचानक का घेतला असा निर्णय?

दरम्यान, बंद मागे घेण्याची घोषणा करतानाच उद्धव ठाकरेंनी एक असा डाव टाकला की, ज्यामुळे आता सरकारसमोर नवा पेच निर्माण होऊ शकतो. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोर्टाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी असं जाहीर केलं की, जरी त्यांचा पक्ष बंद मागे घेत असला तरीही बदलापूर प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी ते उद्या स्वत: शिवसेना भवन येथील चौकात जाऊन तोंडाला काळी फित लावून बसणार आहेत. आपल्याप्रमाणेच इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील अशाप्रकारे निषेध नोंदवावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आहे.

Maharashtra Bandh Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे तोंडाला काळी फीत लावून चौकात बसणार... पाहा नेमकं काय म्हणाले ठाकरे

'उद्या पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद हा विकृतीविरुद्ध होता. आताच थोड्या वेळापूर्वीच उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केली आहे. एका गोष्टीचं बरं वाटलं की, न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं. मी न्यायालयाकडून एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की, ज्या तत्परतेने हा निर्णय दिलाय. तशीच तत्परता जे गुन्हे घडतायेत त्या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्याची सुद्धा दाखवावी.' 

ADVERTISEMENT

'उच्च न्यायलयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, परंतु कोर्टाचा आदर हा ठेवावा लागतो. या निर्णयाविरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पण त्यात वेळ जाऊ शकतो. या बंदचं कारण हे वेगळं होतं.' 

ADVERTISEMENT

'आम्ही असं ठरवलं आहे की, ज्याप्रमाणे पवार साहेबांनी देखील आवाहन केलं आहे की, उद्याचा बंद मागे घ्यावा. तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेत आहोत. मात्र, राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून, काळे झेंडे घेऊन या सगळ्या गोष्टीचा निषेध करतील.'

हे ही वाचा>> Maharashtra Bandh : 'बंद'वरून हायकोर्टाचा MVA ला मोठा झटका, कोर्टाने थेट म्हटलं; 'तर आम्ही...'

'बंदला तुम्ही नाही म्हणालात आम्ही तोंडच बंद ठेवतो. एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे शिल्लक आहे की नाही. मोर्चे, संप यांना सुद्धा बंदी केलीए का? यावर घटनातज्ज्ञांनी मतं मांडली पाहिजे.'

'जी गोष्ट बदलापूरमध्ये घडली ती अतिशय चिंतेची गोष्ट आहे. याविरोधात जर बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर आम्ही आमचं तोंडच बंद ठेवतो.' 

'मी उद्या स्वत: सकाळी 11 वाजता शिवसेना भवन येथील चौकात जाऊन बसणार आहे. तोंडाला काळी फित लावून, हातात काळा झेंडा लावून बसणार आहे. मला वाटतं त्याला कोणी मनाई करू शकत नाही. जर त्यालाही मनाई होणार असेल तर मी जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहत नाही.' 

'आता ज्या काही घटना घडतायेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहे? हे जे कोणी याचिकाकर्ते कोर्टात गेले आहेत त्यांच्यावर आता ही पुढची जबाबदारी राहील. घडणाऱ्या गुन्ह्यांची किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावर.. आणि उच्च न्यायालय याची जबाबदारी घेणार आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे.' 

'माता-बहिणीच्या सुरक्षेसाठी सुरक्षित बहीण.. ही काही योजना नव्हे तर आजच्या काळाची गरज आहे. ती आंदोलनाच्या रुपाने आम्ही चालू ठेवू.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आता नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT