Vasant More : ठाकरेंची साथ सोडणारे वसंत मोरे आहेत तरी कोण?
Vasant More Leave MNS, Raj Thackeray : 'एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा करतो', अशी पोस्ट करून मनसेची साथ सोडली.
ADVERTISEMENT
Vasant More Leave MNS, Raj Thackeray : मनसेचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. ''अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा'', अशा आशयाची पोस्ट करत वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. या पोस्टपुर्वी त्यांनी सोमवारी मध्यरात्री 'एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा करतो', अशी पोस्ट करून मनसेची साथ सोडली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना (Raj Thackeray) धक्का देणारे वसंत मोरे (vasant more)नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (vasant more leave mns raj thackeray who is he pune politics loksabha election maharashtra politics)
ADVERTISEMENT
वसंत मोरे कोण?
- पुण्यातील कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरेंची ओळख आहे. राज ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांच्या यादीत वसंत मोरे अग्रस्थानी होते.
- वसंत मोरेचा जन्म 10 ऑक्टोबर 1975 साली पुण्यात झाला होता. कात्रजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात त्यांचे शालेय तर शाहु मंदिरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाले होते.
- वसंत मोरे राज ठाकरेंप्रमाणेच सुरुवातीला शिवसेनेत होते. त्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी सुद्धा शिवसेना सोडली होती.
- 2007 च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनेसेचे 8 नगरसेवक जिंकले होते.त्यात वसंत मोरेंचा मोलाचा वाटा होता.
- 2012 च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनेसेचे 27 नगरसेवक जिंकले होते. यामध्ये वसंत मोरेंचा समावेश होता.
- या दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढली होती. मात्र त्यांना यश मिळालं नव्हतं.
- 2017 मध्ये वसंत मोरे पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
- 2012 आणि 2013 दरम्यान त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेतेपद देखील भूषवलं.
- कोरोना काळात वसंत मोरे खूप चर्चेत आले होते. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात.
- फेब्रुवारी 2021 मध्ये वसंत मोरेंच्या कष्टाची चीज झाली आणि त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष पद दिलं.
हे ही वाचा : "मी खोटं बोलतो", राऊतांचा पारा चढला, आंबेडकरांना दिलं उत्तर
मनसे सोडण्याचं कारण काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक पावित्रा घेतला होता. राज ठाकरेंचा ही भूमिका कुठेतरी वसंत मोरेंना पटली नव्हती. कारण माझ्या भागातील मुस्लिम बांधव मला सहकार्य करतात,असा वसंत मोरेंचा एकंदरीत सूर होता. मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भुमिकेमुळे अडचण होत असल्याचेही म्हटलं होतं. त्यानंतर मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाच्या या कारवाईनंतरच ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती.
हे ही वाचा : युती तुटली! भाजपच्या खट्टर यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मात्र या नाराजीनंतर वसंत मोरे यांनी मनसे सोडली नाही. ते पक्षात होते, मात्र फारसे सक्रिय नव्हते. पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र पक्षातून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. याउलट राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात येऊन साईनाथ बाबर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आपसूकच वसंत मोरेंचा लोकसभेतून पत्ता कट होणार होता. त्यामुळेच आता वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याचे बोलले जात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT