Aurangzeb Tomb : "औरंगजेबाची कबर उखडा", विहिंपचा इशारा; 'कारसेवा करणार' म्हणजे नेमकं काय?
सरकारने हिंदूंच्या भावना समजून घेऊन औरंगजेबाची कबर तेथून हटवावी, असं आवाहन विहिंपने केलं आहे. सरकारने ही कबर न काढल्यास आम्ही कारसेवा करु असंही म्हटलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी

अन्यथा कारसेवा करण्याचा विहिंपचा इशारा

कारसेवा म्हणजे नेमकं काय? वाचा सविस्तर...
Aurangzeb Tomb and Karsewa : छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली मुघल सम्राट औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. तसंच भाजप, शिवसेनेचे नेते आणि हिंदुत्ववादी संघटनाही या मागणीच्या समर्थनात आहेत. या मागणीसाठी आजपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये खुलताबाद तालुक्यात असलेल्या कबर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर यानंतर आता विहिंपने कबर हटवा अन्यथा कारसेवा करु असं म्हटलंय. (Aurangzeb Tomb Controversy and Karsewa)
विहिंपचा इशारा...
हे ही वाचा >> शरद पवारांनी दिल्लीतील 'तालकटोरा'मध्ये मराठा योध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी का केली? इतिहास काय?
विहिंप आणि बजरंग दलाने औरंजेबाची कबर हटवण्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. कबर हटवण्यास उशीर झाल्यास ‘कारसेवा’ करू, अशी धमकी दिली आहे. महाराष्ट्र-गोवा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांनी वृत्तसंस्था आयएएनएसशी संवाद साधला. काही लोक औरंगजेबाचं गुणगान करण्यात व्यस्त आहेत. औरंगजेब देशाचा आयकॉन होऊ शकत नाही. औरंगजेबानं देशात खूप अत्याचार केले. औरंगजेबानं त्याच्या वडिलांवरही अत्याचार केले. अशा क्रूर माणसाची कोणतीही खूण या भारतात यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे सरकारने हिंदूंच्या भावना समजून घेऊन औरंगजेबाची कबर तेथून हटवावी, असं आवाहन विहिंपने केलं आहे.
बजरंग दलचे नितीन महाजन यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे आणि जर सरकारने तसं केलं नाही, तर बाबरी मशिदीसारखेच या कबरीची अवस्था होईल, असं म्हटलं आहे. सरकारने ही कबर न काढल्यास आम्ही कारसेवा करु असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.
शिवसेनाही आक्रमक...
शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "औरंगजेबाचं थडगं भारतात नको. औरंगजेबाच्या कबरीला मुस्लिम धर्मगंथामध्येही स्थान नाही. ज्यांनी लुटपाट केली त्यांच्या कबरीला पुजायचं नाही असं मुस्लिम धर्मग्रंथ सांगतो. मुस्लिम समाजही म्हणत नाही की, औरंगजेब आमचं दैवत आहे."
कारसेवा म्हणजे काय?
कारसेवा हा शब्द राम मंदिरासाठी सुरू झालेल्या आंदोलनात वापरला गेला. कार सेवा हा मुळात संस्कृत शब्द आहे. कार म्हणजे कर अर्थात हात आणि सेवा किंवा सेवक म्हणजे सेवेकरी. (What is Karsewa)
हे ही वाचा >> Pandharpur : विठुरायाच्या दारातले पंखे फक्त मंत्र्यांसाठी? महिलेनं मुश्रीफांना जाब विचारला, व्हिडीओ व्हायरल
राम मंदिराच्यावेळी देशभरातून असे शेकडो हिंदू कारसेवा करण्याच्या हेतूनं आयोध्येक दाखल झाले होते. राम मंदिर तयार करण्यासाठी कारसेवा करण्याचं या सर्व कारसेवकांचा हेतू आहे असं सांगण्यात येत होतं.
कारसेवक हा शब्द शीख धर्मग्रंथामध्येही वापरला गेल्याचं दिसतं.जालियनवाला बाग प्रकरणातही हा शब्द चर्चेत आला होता. जालियनवाला बाग प्रकरणानंतर उधम सिंह यांनी कारसेवा केली होती असं म्हटंल जातं. तसंच पवित्र सुवर्णमंदिरही कारसेवा करुनच बांधलं गेलं आहे.
आता औरंगजेबाच्या कबरीशी संबंधीत आंदोलनात हा शब्द वापरला जातोय. कबर उघडून टाकण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.