Vijay Wadettiwar : "वाल्मिक कराडने पुरावे नष्ट केल्यावर सरेंडर केलं?", घटनाक्रम सांगत विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

मुंबई तक

वाल्मिक कराड CID कार्यालयात शरण आला, मात्र त्यानंतर आता या सर्व घडामोडींवर शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल शंका उपस्थित केली आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण

point

वाल्मिक कराड CID ला शरण आल्यानंतर काय घडलं?

point

विजय वडेट्टीवार यांनी घटनाक्रमावरुन काय सवाल केले?

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालं. याप्रकरणातील आणि खंडणीच्या प्रकरणातीलआरोपी फरार होते. त्यापैकी सर्वांचं लक्ष लागून असलेल्या वाल्मिक कराड आज पोलिसांसमोर शरण आला आहे. पुण्यातील CID कार्यालयात वाल्मिक कराड शरण आला, मात्र त्यानंतर आता या सर्व घडामोडींवर शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल शंका उपस्थित केली आहे. 

हे ही वाचा >> Manoj Jarange : "आरोपींना पाठबळ देणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पितायत...", कराड शरण, धनंजय देशमुख, जरांगे काय म्हणाले?

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

वाल्मिक कराड शरण आल्यानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले, "खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 दिवस पोलीस-CID वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे.

महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष  बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का?  या वाल्मीक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही!"

हे ही वाचा >> Manoj Jarange : "आरोपींना पाठबळ देणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पितायत...", कराड शरण, धनंजय देशमुख, जरांगे काय म्हणाले?

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनीही असाच दावा करत आज वाल्मिक कराड शरण येईल असं सांगितलं होतं. आव्हाड यांनी आज सकाळी एक्सवर ही पोस्ट टाकल्यानंतर अवघ्या काही तासातच या सर्व घडामोडी घडल्या आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp