Markadwadi: निवडणुकीनंतर पुन्हा मतदान, मारकडवाडीचा नेमका प्रकार काय भाऊ?, सगळं समजेल फक्त...
Markadwadi ballot paper Voting: माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे 3 डिसेंबर रोजी पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. ज्यामुळे तेथील वातावरण तापलं आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मारकडवाडी ग्रामस्थ बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यावर ठाम
बॅलेट पेपरवर उद्या होणार मतदान?
मारकडवाडीमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात
Markadwadi ballot paper Voting issue: नितीन शिंदे, मारकडवाडी, माळशिरस: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी मधील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर शंका घेत उद्या (3 डिसेंबर) रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मोठी तयारी पण केली आहे. प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावल्यानंतरही आता आमदार उत्तम जानकर यांच्या गटाचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्यावर ठाम आहेत. (voting again on ballot paper after the vidhan sabha election what is the exact matter of markadwadi malshiras)
ADVERTISEMENT
ही परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 18 ते 20 जणांना नोटीसही देण्यात आल्या आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावली होती. आता निवडणूक प्रक्रिया संपली असून ग्रामस्थांनी किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेत मतदान व मतमोजणी सुरू असताना कोणताही आक्षेप घेतला नसल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे आता होत असलेली ही चाचणी निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असून बॅलेटवर होणारे मतदान कायद्याला धरून नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा>> Maharashtra New CM: ठरलं, 'या दोन' नेत्यांची मोदी-शाहांनी केली निवड, निवडणार भाजपचा मुख्यमंत्री!
नेमकं प्रकरण काय?
येत्या मंगळवारी म्हणजे 3 डिसेंबरला गावात मतदान होणार असून गावात एकूण तीन मतदान केंद्र होती. यात आता हे मतदान प्रक्रिया माध्यमांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार असल्याची गावकऱ्यांची भूमिका आहे. त्यासाठी लागणारी सर्व तयारी पण करण्यात आली आहे. प्रशासनाचा विरोध असल्याने नेमकी किती ग्रामस्थ मतदान करतात हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे वाचलं का?
माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर १३ हजार मतांनी विजयी झाले. जानकर यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला.
जानकर कमी मतांनी विजयी झाल्यामुळे मारकडवाडीचे ग्रामस्थ खुश नाहीत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जानकर एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले पाहिजे होते.
जानकर यांची मते गमावण्यामागे ईव्हीएमचे षडयंत्र असल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. मारकडवाडीत 80 टक्के मतदान जानकर यांच्या बाजूने झाले असताना, ईव्हीएमवरून वेगवेगळे आकडे समोर येत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Shrikant Shinde : "चर्चा आणि अफवांचं पीक...", मुख्यमंत्रिपदावरुन सस्पेन्स वाढलेला असताना श्रीकांत शिंदेंची पोस्ट
निवडणुकीत राम सातपुते यांना 843, तर जानकर यांना 1003 मते मिळाली. या मतदानाबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली आहे. कारण त्यांना असा संशय आहे की, ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असावी. सातपुते यांना मिळालेली 843 मते संशयास्पद असून त्यांना गावातून 100-150 पेक्षा जास्त मते मिळालेली नसतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
गावात मतदानाचे फलक लावण्यात आले
बॅलेट पेपरवर मतदानासाठी गावोगावी फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी आवश्यक मतपत्रिका छापण्यात आल्या असून, या निवडणुकीत त्यांनी ज्या व्यक्तीला मतदान केले आहे, त्या व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन गावातील सर्व लोकांना करण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश नेत्यांनी 'ईव्हीएम'वर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केल्याने थेट मतपत्रिकेवर मतदान करून 'दूध का दूध, पानी का पानी' असे पाऊल उचलणारे मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे पुन्हा एकदा चाचणी मतदान घेण्याची मागणी केल्याने वातावरण तापलं आहे. कारण आता प्रशासनाने या गावात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. मात्र, असं असलं तरी गावकरी उद्याच्या मतदानावर ठाम आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT