'पवार साहेब कायमस्वरुपी घरी बसा, अनेक लोकांचं वाटोळं केलंय', भाजपच्या बड्या नेत्याकडून हल्लाबोल
Radhakrishna Vikhe-Patil : 'आता जनमत तुम्ही गमावलेलं आहे. तर कायमस्वरुपी तुम्ही घरी बसा, अनेक लोकांचं वाटोळं केलेलं आहे.' अशा शब्दात भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट शरद पवार केली जहरी टीका
'कायमस्वरुपी तुम्ही घरी बसा', विखेंनी पवारांना डिवचलं
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू
शिर्डी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. अशावेळी आता विरोधकांबाबत भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. एवढंच नव्हे तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट शरद पवार यांनाचा घरी बसण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
'शरद पवार साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की, जाणते राजे आहात.. आता जनमत तुम्ही गमावलेलं आहे. तर कायमस्वरुपी तुम्ही घरी बसा, अनेक लोकांचं वाटोळं केलेलं आहे. आता आणखी जनतेचं आणि राज्याचं वाटोळं करू नका.' असं म्हणत राधाकृष्ण विखेंनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
राधाकृष्ण विखे-पाटलांची शरद पवारांवर जहरी टीका
विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी EVM विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. शरद पवार यांनी देखील याबाबत काहीसा संशय व्यक्त केला आहे. ज्यानंतर यावरच बोलताना शिर्डीचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Eknath Shinde: CM पदावर पाणी सोडणाऱ्या शिंदेंना BJP देणार 'या' गोष्टी?, मुलाला उपमुख्यमंत्रिपद अन्...
'त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, लोकसभेला त्यांना एवढं घवघवीत यश मिळालं. आमची पिछेहाट झाली महायुतीची.. त्यावेळी EVM वर का नाही शंका व्यक्त केली? आमचा EVM वर विश्वास नाही असं म्हणत त्यांच्या सर्व खासदारांनी त्याचवेळी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता.'
'म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट भाषेत सांगितलं आहे की, निकाल तुमच्या बाजूने लागला की, EVM चांगलं, जनमत तुमच्या विरोधात गेलं की, EVM वाईट.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Mumbai Tak Chavadi: 'मविआच्या पराभवाचं नेमकं कारण काय?'; अंबादास दानवे म्हणाले, "EVM मध्ये बऱ्याच ठिकाणी..."
'म्हणून मी मागे म्हटलं की, शरद पवार साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की, जाणते राजे आहात.. आता जनमत तुम्ही गमावलेलं आहे. तर कायमस्वरुपी तुम्ही घरी बसा, अनेक लोकांचं वाटोळं केलेलं आहे. आता आणखी जनतेचं आणि राज्याचं वाटोळं करू नका. हीच त्यांना विनंती आहे.' अशी टीका विखेंनी यावेळी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT