वडिलांना न सांगता चार्टर्ड फ्लाइटने बँकॉकला निघालेला तानाजी सावंतांचा मुलगा आहे तरी कोण?

मुंबई तक

Tanaji Sawant Son: वडील तानाजी सावंत यांना न सांगता थेट पुण्यावरुन बॅंकॉंकला गेलेला ऋषीराज सावंत हा आता चर्चेत आला आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी सविस्तर.

ADVERTISEMENT

तानाजी सावंतांचा मुलगा आहे तरी कोण?
तानाजी सावंतांचा मुलगा आहे तरी कोण?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऋषीराज सावंत अचानक का गेला बँकॉकला?

point

तानाजी सावंतांच्या धाकट्या मुलाने का केलं असं?

point

ऋषीराज सावंतची किती आहे संपत्ती?

RushiRaj Sawant: पूजा सोनावणे, पुणे: माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण, तानाजी सावंतांचा मुलगा गायब अशा हेडलाईन्स काल (10 फेब्रुवारी) सगळीकडे झळकताना दिसल्या. पण त्यानंतर समजलं की सावंतांचा मुलगा गायब नव्हता झाला, त्याचं अपहरण नव्हतं झालं... तर तो कोणालाही न कळवता थेट बॅंकॉंकला निघाला होता. आता तो पुणे एअरपोर्टवरुन चार्टर फ्लाईटने गेला होते. सावंताना हे समजताच त्यांनी सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या. आणि काही तासांमध्ये हे फ्लाईट अंदमान निकोबार बेटावरुन पुन्हा मागे वळवलं. (who is tanaji sawant son who left for bangkok on a chartered flight without informing his father know about rushiraj sawant)

त्यानंतर तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज हा सुखरुप घरी पोहोचला. वडिलांना न सांगता थेट पुण्यावरुन बॅंकॉंकला गेलेला ऋषीराज सावंत नेमका कोण? चार्टर फ्लाइटसाठी 50 लाखांहून आधिक खर्च लागतो, अशावेळी त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून? तो नेमका काय करतो.. असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. आता हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया.

सगळ्यात पहिल्यांदा काल काय झालं हे थोडक्यात जाणून घेऊया...

पुणे पोलीस कंट्रोल रुमला काल संध्याकाळी एक फोन आला, की तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झालं त्यानंतर ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि सगळ्या यंत्रणा सावंतांच्या मुलाच्या शोधासाठी सज्ज झाल्या. त्यानंतर तानाजी सावंतांना ही माहिती मिळाली की तो पुणे एअरपोर्टवरुन बॅंकॉकला गेला आहे. त्यानंतर हे फ्लाईट अंदामान-निकोबार बेटावरुन थेट मागे वळवण्यात आलं आणि सावंताचं मुलगा घरी सुखरुप पोहोचला.

हे ही वाचा>> "शरद पवार साहेबांची राजकारणातील गुगली...", महादजी शिंदे पुरस्कार मिळाल्यानंतर DCM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान!

'मी काळजीत होतो. 8-10 दिवसांआधीच तो दुबईला गेला होता. अचानक कसा परत गेला? हा प्रश्न पडला होता. न सांगता गेला, रोज आम्ही 10 ते 15 वेळा बोलतो.' असं माध्यमांना सांगत तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाविषयी चिंता व्यक्त केली होती. 

कोण आहे ऋषीराज सावंत?

ऋषीराज तानाजी सावंत हा माजी मंत्री आणि धाराशिवच्या भूम-परंडा मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत याचे धाकटे चिरंजीव आहेत. तानाजी सावंताना दोन मुलं, त्यातला मोठा मुलगा गिरीराज सावंत तर लहान ऋषीराज सावंत.

हे ही वाचा>> 'आर्ची'ला भेटला खऱ्या जीवनातील 'परशा'! रिंकू राजगुरू होणार भाजप खासदाराची सून, 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

ऋषीराज हा 32 वर्षांचा असून तो विवाहीत आहे. त्याच्या साखरपुड्याचा हा एक फोटो सुद्धा समोर आला आहे. जो की 2019 सालचा आहे. ऋषीराजचं शिक्षण एम टेक पीएचडी झालं आहे. तो करतो काय हे जाणून घेण्याआधी त्याच्या संपत्तीकडे जरा नजर टाकूयात. 

आता 68 लाखांच्या फ्लाईटने फिरणाऱ्या माजी मंत्र्याच्या मुलाची संपत्ती किती? याची उत्सुकता तुम्हालाही असेल. पण ऋषीराज सावंत याची संपत्ती जाणून घेण्याआधी आपण तानाजी सावंत यांची किती संपत्ती आहे हे जाणून घेऊया.

निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तानाजी सावंत शिंदेंच्या शिवसेनेच्या सगळ्यात श्रीमंत असलेल्या आमदारांपैकी एक आहेत. 205 कोटी रुपयांची एकूण संपत्ती ही तानाजी सावंताची आहे.

तानाजी सावंतांच्या स्वत:च्या नावावर 128 कोटी 66 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 29 कोटी 33 लाख रुपये स्थावर मालमत्ता. 2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार मोठा मुलगा गिरिराज याच्या नावावर 4 कोटी 33 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तर  ऋषीराज याच्या नावावर 4 कोटी 10 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच 5 कोटी 50 लाख रुपयांची जमीन सुद्धा त्याच्या नावावर आहे. 

गिरिराज इन्फ्रा सोलुशन, भैरवनाथ शुगर वर्क्स, जे एस पी एम विद्यापीठ, न्यूट्रीफास्ट एग्रो इंटरनेशनल या सगळ्यांचे शेअर्स ऋषीराजच्या नावावर आहे. पुण्यातल्या जे एस पी एम विद्यापीठाचा सगळा कारभार ऋषीराज सांभाळतो. लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजय जगताप यांचा ऋषीराज सावंत हा जावई आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp