‘एसंशि’, ‘एसंशि’ असं सारखं का बोलत होते उद्धव ठाकरे.. 'या' शब्दाचा नेमका अर्थ काय?
उद्धव ठाकरे यांनी 'एसंशि' असा उल्लेख करत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या उद्धव ठाकरेंनी असं बोलण्यास का केली सुरुवात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

‘एसंशि’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

शिंदे गटाकडून 'उबाठा' असा होतो उल्लेख

आता उद्धव ठाकरेंनी 'एसंशि' असा उल्लेख करण्यास केली सुरुवात
मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (27 मार्च) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ‘एसंशि’ हा शब्द वापरत शिंदे गटाला सूचकपणे डिवचलं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी 'एसंशि' असा जो उच्चार केला आहे. त्यावरून आता दोन्ही शिवसेनेत नवा वाद पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे वारंवार 'एसंशि' असं का म्हणाले हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
सगळ्यात आधी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पाहूया
शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, 'एक गोष्ट.. मला बरं वाटलं जरा की, ज्या वेळेला शिवसेनेला. म्हणजे शिवसेना एकच आहे. 'एसंशि' ही शिवसेना मी मानतच नाहीए. एसंशि हा एक गट आहे. त्यामुळे एसंशि गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काही बोलत नाही. त्यांना शिवसेना मानण्याची काही गरज नाही.'
हे ही वाचा>>सौगात-ए-सत्ता, हिंदूत्व सोडलं ते खंडोजी खोपडे...उद्धव ठाकरे शिंदे-भाजपवर तुफान बरसले
'शिवसेना UBT नाही, शिवसेना एकच आहे... दुसरी आहे ती गद्दार सेना आहे. मी उघडउघड म्हणतोय की, ती गद्दार सेना आहे. गद्दारांची सेना आहे. स्टुडिओमध्ये जी तोडफोड झाली त्यात शिवसेनेचा काडीचाही संबंध नाही. ती गद्दार 'एसंशि' सेना आहे.'
'या 'एसंशि' सेनेने या सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे एसंशि जे काही आहे ते एसंशिने करू दे. ती गद्दार सेना आहे. पण एसंशिची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसंशि गद्दार आहे.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ठाकरे‘एसंशि’असा उल्लेख का केला?
उद्धव ठाकरे यांनी वापरलेला ‘एसंशि’ हा शब्द त्यांनी शिंदे गटाला डिवचण्याच्या दृष्टीने केला असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं संपूर्ण नाव आहे. पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांकडून सातत्याने त्याचा 'उबाठा' असा उल्लेख केला जात होता. त्यामुळे आता तशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी एकनाथ संभाजी शिंदे या नावाचा शॉर्टफॉम करत 'एसंशि' असं ठळकपणे आणि उपहासात्मक बोलण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा>> Eknath Shinde : कुणाल कामरावर पहिल्यांदाच बोलले, एकनाथ शिंदे म्हणाले 'त्या' तोडफोडीचं समर्थन नाही, पण...
शिंदे गटावर हल्लाबोल
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली. “एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचं नाव वापरून सत्ता मिळवली, पण त्यांच्याकडे स्वतःचं काहीच नाही. खरी शिवसेना आमचीच आहे, बाकी सगळं ‘एसंशि’ आहे,” असं ते म्हणाले.
2022 मध्ये शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत फूट घडवून आणली आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सातत्याने शाब्दिक चकमकी होत आहेत. ठाकरे यांनी यापूर्वीही शिंदे गटाला ‘गद्दार सेना’ संबोधलं होतं, आणि आजच्या वक्तव्यातून त्यांनी पुन्हा एकदा तेच विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.