Tanaji Sawant: अजित पवारांचं नाव घेताच तानाजी सावंतांना उलट्या का होतात? Inside स्टोरी

निलेश झालटे

ADVERTISEMENT

तानाजी सावंत असं का म्हणाले?
तानाजी सावंत असं का म्हणाले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तानाजी सावंत पुन्हा एकदा आले चर्चेत

point

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत तानाजी सावंत असं का बोलले?

point

विधानसभा निवडणुकीआधी तानाजी सावंतांनी का केलं 'ते' विधान?

धाराशिव: जनरली सामान्य माणसांना उलट्या होण्याआधी मळमळ होते. मळमळ होत असल्याचं लक्षात येताच माणूस उलट्या करतो. आता आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या उलट्यांचा विषय मोक्कार गाजतोय. सावंतांच्या महायुतीमध्ये उलट्या होण्याची सुरुवात तशी लोकसभा निवडणुकीपासूनच झालीय. धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीच्या अर्चना पाटलांचा तब्बल 3,30,790 मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. या लीडमध्ये 80 हजारांहून जास्तीचा लीड हा तानाजी सावंतांच्या मतदारसंघातून मिळाला आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता आरोग्यमंत्र्यांना उलट्या होण्याचं हेच कारण आहे का? तर नाही.. (why does tanaji sawant vomit at the mention of ajit pawar name inside story mahayuti politics)

ADVERTISEMENT

ते काय आहे हे पुढे आपण बघणारच आहोत. मात्र महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडे लोकसभेनंतर आता जसजसी विधानसभा जवळ येतेय तशा अनेक ठिकाणच्या कुरबुरी चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. यात लोकसभेलाही सावंत आघाडीवर होते आणि आताही ते आघाडीवर दिसत आहेत. सावंतांच्या या उलट्या नव्या नाहीत. त्यांच्या या उलट्यांमागे बरीच कारणंही आहेत. याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.

तानाजी सावंत यांच्या टीकेमागचं नेमकं राजकारण काय?

आधी सावंतांनी काय म्हटलंय बघा...  'मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही,' या विधानानंतर आता दादांचे नेते सावंतांवर सडकून टीका करायला मैदानात उतरलेत. कोणत्याही युतीमध्ये भडका उडायला या छोट्या छोट्या ठिणग्या पुरेशा आहेत असं विश्लेषक सांगत असतात.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Sindhudurga: शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी शिंदे सरकारचा नवा जीआर जसाच्या तसा..

तानाजी सावंत म्हणजे सतत चर्चेत असणारे नेते....शिवाय एकनाथ शिंदेंच्या मर्जीतले.. खेकड्यामुळं धरणं पडलं, हाफकीन संस्था, मराठा आरक्षण, अजब दौरे, अधिकाऱ्यांसोबतचे वाद अशा एक ना अनेक गोष्टींनी चर्चेत येणारे तानाजी सावंत सध्या त्यांना होत असलेल्या उलट्यांमुळं चर्चेत आहेत. 

बरं या उलट्या त्यांना त्यांच्याच सोबत असलेल्या मित्रपक्षामुळं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळं होत असल्याचं समोर आल्यानं बरीच चर्चा सुरु आहे. मात्र त्यांना या उलट्या आताच येत नाहीयेत याआधी लोकसभेला भाजपच्या विरोधातही त्यांनी रोखठोक भूमिका घेतली होती. शेतकरी परिवारातून आलेला हा नेता आपल्या फटकळ आणि बिनधास्त बोलण्यामुळं नेहमीच चर्चेत असतो. मात्र आपल्या विधानमुळं ते आपल्या नेत्यांना मात्र अडचणीत आणताना दिसत आहेत.  

ADVERTISEMENT

सावंत तसे बोलायला मोकळेढाकळे आहेत, मात्र युतीत असताना काही गोष्टी पाळाव्या लागतात ज्या त्यांच्याकडून होताना दिसल्या नाही. धाराशिवमधल्या भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल मोटे यांचा ३२९०२ मतांनी पराभव केला होता. हा त्याअर्थी मोठा विजय होता, मात्र तेव्हा ते मूळ शिवसेनेत होते. त्यांच्या शिंदे गटात जाण्यावरून जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला होता. नंतर त्यांना मंत्रिपद पुन्हा मिळालं. लोकसभेच्या आधी देखील त्यांची नाराजी त्यांनी खुलेआम बोलून दाखवलेली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : आजच भरून घ्या अर्ज..., 3000 मिळवण्यासाठी उरले शेवटचे काही तास!

28 वर्षाच्या इतिहासात ही जागा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली गेलेली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीकडून राष्ट्रवादीने जागेवर आपला दावा सांगितला. तानाजी सावंत यांच्या नेतृत्त्वात शिवसेना शिंदे गटाने आग्रही होत जागेवर दावा केला. मात्र अखेर महायुतीमधील सखोल मंथनानंतर ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली.  अजितदादांच्या समोर तानाजी सावंतांनी उघड गोष्टी बोलून दाखवलेल्या. 

त्यावेळी त्यांनी म्हटलेलं, ‘समोरच्याचा फडशा पाडण्यासाठी महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही येऊ. पण, अशाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचा एकेक मतदारसंघ कमी होत राहिला तर, हा शिवसैनिक आणि आम्ही स्वत: हे सहन करणार नाही. कारण, हा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा आहे, येथील खासदार 8 वेळा शिवसेनेचा राहिला आहे. हा माझ्या तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे.’
 
लोकसभा झाली आणि ओमराजेंनी विक्रमी विजय मिळवला. यात ओमराजेंना तानाजी सावंत यांच्या परंडा मतदारसंघात 1 लाख 33 हजार 848  मतं मिळाली तर अर्चना पाटील यांना 52 हजार 671 मते मिळाली. ओमराजे निंबाळकरांना विक्रमी 81 हजार 177 मतांची आघाडी मिळाली.  

या आकड्यांमुळं खरतर सावंतांची धाकधूक वाढलीय. तानाजी सावंत यांनी अर्चना पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करणार असा मेसेज देऊनही तानाजी सावंत यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. त्यांच्याबाबत मतदारसंघात अँटीइकंबंसी वाढल्याचं देखील स्थानिक विश्लेषक सांगतात. त्यामुळं सावंत आधीपासूनच दादांच्या राष्ट्रवादीवर खार खाऊन असल्याचं दिसून येतं. 

धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यातही सावंतांचा वावर असतो. शिक्षणसंस्थांच्या जाळ्यामुळं पुण्यात सुद्धा सावंत दिसत असतात. शिवाय यवतमाळमधून विधानपरिषदेवर निवडून जाण्यात त्यांनी यश मिळवलेलं. आधी ठाकरेंसोबत नंतर शिंदेंसोबतही महत्त्वाचं खातं त्यांच्या वाट्याला आलं. यावरुन सावंतांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करुन शिंदेंनाही चालणार नाही. मात्र सतत त्यांच्या या वक्तव्यांमुळं जर युतीत कुस्ती होत असेल तर मात्र मोठ्या नेत्यांना यात लक्ष घालावं लागणार आहे. 

सावंत असतील, रामदास कदम असतील, संजय शिरसाट, भरत गोगावले, विजय शिवतारे, संजय गायकवाड अशी एक नाही अनेक नावं आहेत जे अजितदादांच्या राष्ट्रवादीला समोर येऊन वारंवार टार्गेट करताना दिसताहेत. याला उत्तर देताना दादांचे नेतेही कमी पडत नाहीत. मात्र या सगळ्यांचा वाद मिटवताना दादा असतील किंवा शिंदे, अशा मोठ्या नेत्यांची मात्र दमछाक होते. भाजप याकडे कसं पाहतं हे लक्षात येत नाही. आम्ही युती म्हणून यावर तोडगा काढू हे मोठ्या नेत्यांचं ठरलेलं उत्तर असतं. मात्र, अशा बारीक बारीक ठिणग्यांमुळं भडका उडाल्यास विधानसभेला रंगत येणार हे मात्र नक्की... 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT