Rupali Chakankar : EVM ची पूजा करणाऱ्या रुपाली चाकणकर प्रचंड अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

case register against rupali chakankar in sinhagad police station evm worship
रुपाली चाकणकर यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
social share
google news

Rupali Chakankar Against Case Register : तिसऱ्या टप्प्यातलं मतदान संपु्ष्ठात आल्यानंतर एक मोठी बातमी आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ईव्हीएम मशीनची पूजा करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. (case register against rupali chakankar in sinhagad police station evm worship) 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 'BJP हा फुटलेला पक्ष नाही मात्र शिवसेना..', CM शिंदेंचं मोठं विधान

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आज ताट आणि दिवा घेऊन मतदान केंद्रावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी थेट ईव्हीएम मशीनची पूजा केली. मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निदर्शनास ही बाब येताच, याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आता आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान रुपाली चाकणकर या बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होत्या. सुप्रिया सुळे यांच्या प्रत्येक टीकेवर त्या प्रत्युत्तर द्यायच्या. त्यामुळे चाकणकर चर्चेत असायच्या.आता सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे चाकणकर चर्चेत आल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : अजितदादांच्या आमदाराची तुफान शिवीगाळ, बारामतीत राडाच-राडा!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT