Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे
Assembly Election 2024 News : महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत आगामी विधानसभा निडणूकीत महाविकास आघाडीला जबर झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडीला झटका बसणार आहे, तर महायुतीचं (Mahayuti) काय होणार आहे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार?
मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती?
कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार?
Zee 24 Tass Maha Ai Survey : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. नेत्यांकडून मतदार संघाचा आढावा आणि जोर बैठका घेतल्या जात आहे. एकंदरीत ही सर्व तयारी सूरू असताना महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत आगामी विधानसभा निडणूकीत महाविकास आघाडीला जबर झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडीला झटका बसणार आहे, तर महायुतीचं (Mahayuti) काय होणार आहे? हे जाणून घेऊयात. (zee 24 taas maha ai survey first ai survey with zeenia maha vikas aghadi mahayuti vidhan sabha electon 2024 assembly election 2024)
ADVERTISEMENT
झी 24 तासने महा AI सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत आज जर निवडणूका झाल्या तर कुणाचं सरकार येणार? असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात आला होता. यावर 47 टक्के लोकांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार यावं यासाठी पसंती दिली आहे. तर महाविकास आघाडीला 39 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 14 टक्के लोकांनी या दोन्ही आघाड्यांनी पसंती दिली नाही आहे.
हे ही वाचा : Amol Mitkari : ''शेलारांनी पाठ सोलून काढा ही भाषा...'', अजित पवारांचा आमदार 'हे' काय बोलून गेला
महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार?
महायुती 47 टक्के
महाविकास आघाडी 39 टक्के
इतर 14 टक्के
आज जर निवडणूक झाली तर मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल. यावर महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना सर्वांधिक पसंती दिली आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या खालोखाल एकनाथ शिंदे यांना सर्वांधिक पसंती मिळाली आहे. तर तिसऱ्या स्थानी उद्धव ठाकरे यांचे नाव आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती?
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे
कुणाला बहुमत मिळणार?
महाराष्ट्रात आज निवडणूका झाल्या तर भाजपला बहुमत गाठता येईल आणि स्वबळावर सत्ता मिळू शकते, असे नागरीकांना वाटते. कारण महाराष्ट्रातील 38 टक्के जनतेला वाटत की भाजप स्वबळावर सत्ता आणू शकते.आणि 22 टक्के जनतेला वाटते की शिवसेना शिंदे गट बहुमतावर सत्ता आणू शकते. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं 17 टक्के मतं व्यक्त केलीय. तर काँग्रेस पक्षाला केवळ 14 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9 टक्के लोकांनी पसंती दिलीय
हे मुद्दे निर्णायक ठरणार?
लोकसभेत मराठा आक्षणाचा मुद्दा, कांद्याचा प्रश्न आणि फेक नरेटिव्ह असे अनेक मुद्दे महायूतीच्या पराभवाला कारणीभूत ठरले होते. पण विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचं 45 टक्के लोकांना वाटतंय तर 45 टक्के लोकांना हा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरणार नाही असं वाटतंय. तर 10 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Uddhav Thackeray: मविआने रणशिंग फुकलं! ठाकरेंचा मित्रपक्षांनाच क्लिअर 'मेसेज'
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुद्दा देखील निवडणूकीत प्रभावी ठरणार आहे. महाराष्ट्रातील 55 टक्के लोकांना वाटतं की हा मुद्दा प्रभावी ठरणार आहे. तर 30 टक्के लोकांना हा मुद्दा प्रभावी ठरणार नाही,असे वाटत आहे. त्यासोबत 15 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान विरोधकांकडून नेहमीच भापजवर वॉशिंग मशीन असल्याच आरोप होतो. जे नेते विरोधात असतात ते भ्रष्टचारी असतात आणि भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्ट्राचाराचे डाग पुसले जातात,असा आरोप होतो. त्यामुळे 20 टक्के लोकांनी भ्रष्टाचाऱ्यांचे आरोप असलेल्यांना सरकारमध्ये स्थान देनं योग्य असल्याची भूमिका मांडली तर 70 टक्के लोकांनी भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्यांना पक्षात घेऊ नये असं म्हटलंय. तर सांगता येत नाही असं 10 टक्के लोकांना वाटतं आहे.
ADVERTISEMENT