युतीच्या जागा वाटपावरून सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेना नेत्याला सुनावलं!
जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो. जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषदेत ठरायला लागला, जाहीर सभेत ठरायला लागला तर हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही,असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
Sudhir Mungantiwar reply Gajanan Kirtikar : लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला आणखीण वर्षभराचा कालावधी उरला आहे. मात्र तरीही भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून वाद सुरु झाल्याचे राज्यात चित्र आहे. विधानसभेत शिवसेना 126 जागा लढणार असल्याचे विधान शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) यांनी केले होते. या विधानावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar)यांनी त्यांना सुनावले आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो. जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषदेत ठरायला लागला, जाहीर सभेत ठरायला लागला तर हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही,असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. (bjp sudhir mungantiwar slams shivsena mla gajanan kirtikar lok sabha legislative assembly)
ADVERTISEMENT
निवडणूक तर एक वर्षावर आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला हा माईकवरून, पत्रकार परिषदेतून, टीव्ही चॅनेलवरून कधीच ठरत नाही. जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषदेत ठरायला लागला, जाहीर सभेत ठरायला लागला तर हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावले आहे. तसेच केंद्रात अमित शाह (गृहमंत्री), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी एकत्र बसतील. आणि फॉर्म्युला ठरवतील, असे देखील मुनगंटीवार (sudhir mungantiwar) म्हणाले आहेत.
ठाकरेंच्या सभेआधी संजय राऊतांचा शिंदेंवर ‘वार’, दादा भुसेंना दिला इशारा
दरम्यान जिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, त्या जागा त्यांनी घेतल्याच पाहिजेत आणि भाजपाने त्या त्यांना दिल्याच पाहिजेत. तसेच भाजपालाही त्यांच्या जागा मिळायला पाहिजेत,असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.आमचं सरकार हे प्रगती करणारं सरकार असलं पाहिजे. आमचं लक्ष्य मंत्रालयाचा सहावा मजला असता कामा नये. आमचं लक्ष्य हे भामरागडमधला शेवटचा आदिवासी बांधव असला पाहिजे. म्हणून जागावाटप हे काही टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून शंभर टक्के ठरणार नाही, असे मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती, संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
गजानन कीर्तिकर काय म्हणाले ?
लोकसभेला २२, विधानसभेला १२६ जागा आमच्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होईल, पण आकडे बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना काय कमजोर नाही, असे शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) म्हणाले होते. तसेच विधानसभेत शिवसेना १२६ जागा, तर १६२ जागा भाजप लढली होती. लोकसभेला भाजपला २६, तर आम्हाला २२ जागा मिळाल्या होत्या. तो फॉर्म्युला कायम राहिला पाहिजे, असे किर्तीकर म्हणाले होते.
‘कोणाचीही सत्ता असो आपण पक्के’, अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या
दरम्य़ान याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप 288 पैकी 240 जागा लढेल असे एका सभेत सांगितले होते. त्यामुळे शिंदे गटाला केवळ 48 जागा लढाव्या लागतील, असे दिसून येत होते. बावनकुळे यांच्या या विधानानंतर राज्यात जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT