Virat Kohli : 'विराट' विजयानंतर कोहलीने केली मोठी घोषणा, चाहत्यांना धक्का!

मुंबई तक

ADVERTISEMENT

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
रोहित शर्मासोबत विराट कोहली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा

point

टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात कोहलीने केल्या 76 धावा

point

विराट कोहली आयपीएलमध्ये खेळत राहणार

Virat Kohli retires from T20 internationals : अखेर करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींचे स्वप्न पूर्ण झाले. तब्बल तेरा वर्षांनंतर भारताने विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्वास रोखून ठेवायला लावणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले आणि दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. पण, या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहलीने चाहत्यांना धक्का देणाऱ्या निर्णयाची घोषणा केली. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. (Virat Kohli Retired From T20Is After India's T20 World Cup won)

ADVERTISEMENT

विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टी20 विश्वचषक भारतीय संघाने जिंकल्यानंतर विराटने तशी घोषणा केली. अंतिम आणि भारतीय संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात विराट कोहलीने जबाबदारीने फंलदाजी करत 76 धावा केल्या. 

निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना विराट कोहली काय म्हणाला?

विराट कोहली 'सामनावीर'चा मानकरी ठरला. यावेळी बोलताना कोहली म्हणाला की, हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप आहे. एक टीम म्हणून आम्हाला विश्वचषक जिंकायचा होता. एखाद्या दिवशी तुम्ही धावा काढू शकत नाही, त्यादिवशी अशा गोष्टी घडतात. विराट म्हणाला, 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ईश्वर महान आहे आणि जेव्हा गरज होती तेव्हा मी संघासाठी खेळलो. हा भारतासाठी माझा शेवटचा टी20 सामना आहे. आता नाही तर कधीच नाही. मी याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ इच्छित होतो. विश्वचषक हातात घ्यायचा होता. परिस्थितीचा आदर करू इच्छित होतो.

हेही वाचा >> भारताचा ऐतिहासिक विजय, 13 वर्षानंतर जिंकला वर्ल्ड कप

आता नव्या पिढीची वेळ - विराट कोहली

विराट कोहली पुढे बोलताना असंही म्हणाला की, मी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याची गोष्ट लपून राहिलेली नाही. आता नव्या पिढीची वेळ आहे. काही खूप चांगले खेळाडू संघाला पुढे घेऊन जातील आणि झेंडा फडकावत राहतील. 

कोहली 2022 पासून 2024 पर्यंत टी20 क्रिकेटपासून होता दूर

विराट कोहली 2022 पासून टी20 क्रिकेटपासून दूर होता. तो भारतीय संघासाठी खेळत नव्हता. पण, जानेवारी 2024 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत तो टी20 संघात परतला. तेव्हापासूनच अशी चर्चा सुरू झाली होती की, हा टी20 वर्ल्ड कप विराट कोहलीचा शेवटचा विश्वचषक असेल. 

ADVERTISEMENT

विराट कोहलीची टी20 क्रिकेटमधील कामगिरी

भारतीय संघाकडून खेळताना विराट कोहलीने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2011 मध्ये कोहलीचा समावेश असलेल्या भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि आता टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपचा माजी आमदार हनीट्रॅपच्या जाळ्यात? 1 कोटीची मागितली खंडणी; प्रकरण काय? 

विराट कोहलीने 2008 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने एकूण सहा विश्वचषक स्पर्धा खेळल्या. कोहलीने टी20 विश्वचषक स्पर्धांदरम्यान 35 सामने खेळले आहेत. त्याने 58.72 च्या सरासरीने आणि 128.81 स्ट्राईक रेटने 1,290 धावा केल्या आहेत. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 15 अर्धशतके केली आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT