Delhi skipper Axar Patel fined: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला पुन्हा धक्का, सामना हरताच भरावा लागला दंड!
आयपीएल (IPL) 2025 मधील 29 वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात रंगला. या सामन्यात दिल्लीच्या संघाला हार तर पाहावीच लागली परंतु, याव्यतिरिक्त या संघाचा कर्णधार अक्षर पटेलला दंड भरावा लागला. कशाविषयी आणि का? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दिल्लीची हार

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला ठोठावण्यात आला दंड

अक्षर पटेलला 12 लाखांचा दंड का ठोठावण्यात आला?
Delhi skipper Axar Patel fined: आयपीएल (IPL) 2025 मधील 29 वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात रंगला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभव पत्करावा लागला. तब्बल 4 सामने जिंकल्यानंतर दिल्लीच्या संघाला हार तर पाहावीच लागली परंतु, याव्यतिरिक्त या संघाचा कर्णधार अक्षर पटेलला दंड भरावा लागला. स्लो ओव्हर रेटसाठी त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स (MI) ने दिल्ली कॅपिटल्स ( DC) ला 12 धावांनी पराभव पॉइंट्स टेबलवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या सतत जिंकण्याच्या मालिकेत खंड पडला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. करुण नायरने 40 चेंडूत 89 धावा केल्यानंतरही शेवटी धावबादची हॅटट्रिकनंतर त्यांचा मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात हार पत्करावी लागली.
हे ही वाचा: MS Dhoni Out Controversy: धोनीला बाद दिलं अन् गदारोळ! 'ते' दिसलं तरी थर्ड अंपायरने का बदलला नाही निर्णय?
भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, 'दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला दंड ठोठावण्यात आला आहे.'
'IPL आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत स्लो ओव्हर रेटशी संबंधित हा त्याच्या संघाचा कर्णधार असलेल्या कालावधीतील पहिलाच गुन्हा होता, त्यामुळे अक्षर पटेलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.'
हे ही वाचा: LSG vs PBKS : 3 सामन्यात फक्त 17 धावा... 27 कोटींचा ऋषभ पंत पुन्हा ठरला फ्लॉप
कर्णधार अक्षर पटेलच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याला 5 सामन्यात एकही विकेट मिळालेली नाही तसेच त्याने फलंदाजीने केवळ 67 धावा केल्या आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.