MS Dhoni Out Controversy: धोनीला बाद दिलं अन् गदारोळ! 'ते' दिसलं तरी थर्ड अंपायरने का बदलला नाही निर्णय?
एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना रंगला. मॅचदरम्यान, सुनील नरेनच्या चेंडूवर महेंद्र सिंग धोनी LBW वर आउट असल्याचं अंपायरने घोषित केलं होतं. अंपारच्या या निर्णयावर धोनीने DRS (डिसीजन रिव्ह्यू सिस्टम) चा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धोनीला दिला LBW आउट

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात चेन्नईची हार

पहिल्यांदाच CSK चा असा पराभव
MS Dhoni LBW DRS out: CSK विरुद्ध KKR च्या सामन्यात खरंच, धोनी LBW (लेग बिफोर विकेट) वर आउट झाला होता का? मॅचदरम्यान सुनील नरेनच्या चेंडूवर महेंद्र सिंग धोनी आउट असल्याचं अंपायरने घोषित केलं होतं. अंपायरच्या या निर्णयावर धोनीने DRS (डिसीजन रिव्ह्यू सिस्टम) चा निर्णय घेतला. मात्र, DRS नंतरसुद्धा थर्ड अंपायरने धोनी आउट असल्याचं सांगितलं. लाइव्हमध्ये सुद्धा धोनीच्या बॅटमधून स्पाइक दिसलं. यावर सोशल मीडियावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
इंडियन प्रिमियर लीग (IPL) 2025 मध्ये एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना रंगला. या सामन्यात चेन्नईला 8 विकेट पराभव पत्करावा लागला. या टूर्नामेंटमध्ये चेन्नई सलग पाचव्यांदा हरली आहे. धोनीची ही टीम आता पॉइंट्स टेबलवर नवव्या क्रमांकावर आहे. टीममधील ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असल्याकारणाने महेंद्र सिंह धोनीकडे कर्णधार पद सोपावण्यात आलं.
7 विकेट पडल्यानंतर चेन्नईची टीम अडचणीत असताना धोनी मैदानात उतरला. धोनी मैदानात आल्यानंतर स्टेडियममध्ये सुमारे यावेळी सगळ्यांनाच धोनी शिवम दुबेसोबत डावाला आकार देईल असं वाटलेलं. मात्र, असं काहीच झालं नाही.
हे ही वाचा: K L Rahul ने कांतारा सिनेमासारखं का केलं सेलिब्रेशन? क्रीडा विश्वात खळबळ
कोलकाता नाइट रायडर्सच्या विरोधात चेन्नई सुपर किंग्सचा डाव सुरु असताना 16 व्या ओव्हरमध्ये धोनीला सुनील नरेनच्या चेंडूवर LBW म्हणून बाद ठरवण्यात आलं. यानंतर धोनीने लगेच रिव्ह्यूचा निर्णय घेतला. कारण धोनीच्या मते, चेंडू बॅटला लागून गेला होता.
चेंडू बॅटजवळून जात असताना अल्ट्राएजमध्ये थोडासा स्पाइकही दिसला. मात्र, यावर विचार आणि चर्चा केल्यानंतर, तिसऱ्या पंचाने चेंडू बॅटला लागला नसल्याचा निर्णय दिला. बॉल-ट्रॅकरवर चेंडू पाहिल्यानंतर धोनीला बाद घोषित करण्यात आले. परंतु, यामुळे चेपॉकमध्ये असलेल्या प्रेक्षकांना विश्वासच बसत नव्हता.
सोशल मीडियावरही चाहत्यांनी यासंबंधी बरेच प्रश्न उपस्थित केले. तसेच, स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान, पियुष चावलाने व्यक्त केलेले मत वेगळे होते. याच वेळी, असे बरेच लोक होते जे पंचांच्या निर्णयाशी सहमत असल्याचे दिसून आले.
या निर्णयाने CSk च्या चाहत्यांना धक्का बसला. धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 4 चेंडूत फक्त 1 धाव करू शकला.
हे ही वाचा: लालबागचा राजाच्या मंडपातील कार्यकर्ता ते ठाकरेंचा विश्वासू शिलेदार.. कोण आहेत सुधीर साळवी?
पहिल्यांदाच चेन्नईची एवढी वाईट परिस्थिती
चेन्नईसाठी हा सामना एका वाईट स्वप्नाप्रमाणेच ठरला, कारण आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेपॉकमधील त्यांचा सलग तिसरा पराभव होता. या सीझनमध्ये त्यांचा हा सलग पाचवा पराभव होता. यामुळे ते पॉइंट टेबलमध्ये अगदी खालच्या स्थानावर आहेत. चेन्नईने केलेला 103/9 हा त्यांचा या मैदानावरील सर्वात कमी तसेच आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात कमी धावसंख्या असलेला सामना ठरला.