Ind Vs Sa Final : फायनल सामन्यात विराटची बॅट तळपली, दक्षिण आफ्रिकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

t20 world cup 2024 india vs south africa final match virat kohli hits half century axar patel shivam dube
विराट कोहलीची 76 धावांची अर्धशतकी खेळी केली.
social share
google news

Ind Vs Sa Final Match :टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची फायनल सामन्यात बॅट तळपली आहे. विराट कोहलीची 76 धावांची अर्धशतकी खेळी आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या बळावर टीम इंडीयाने 7 विकेट गमावून 176 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचे आव्हान असणार आहे. (t20 world cup 2024 india vs south africa final match virat kohli hits half century axar patel shivam dube)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीच निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार विराट आणि रोहितच्या जोडीने तुफानी सुरुवात केली होती. मात्र केशव महाराजने येऊन टीम इंडियाचे एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले होते. केशव महाराजने रोहित शर्माला 9  धावावर आऊट केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या रिषभ पंतला शुन्य धावावर बाद केले. 

हे ही वाचा : भाजपचा माजी आमदार हनीट्रॅपच्या जाळ्यात? 1 कोटीची मागितली खंडणी; प्रकरण काय?

पंतनंतर मैदानावर आलेल्या सुर्यकुमार यादववर चांगल्या खेळीची अपेक्षा होती.मात्र त्याला देखील मोठी खेळी करता आली नाही आणि तो 3 धावावर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या अक्षर पटेल आणि विराटने डाव सांभाळला. अक्षर पटेलने 31 बॉलमध्ये 41 धावांची खेळी केली, त्यानंतर तो रनआऊट झाला. त्यानंतर शिवम दुबेने 27 धावांची खेळी केली. मात्र तो देखील आऊट झाला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एका बाजूने विकेट पडत होते, तर दुसऱ्या बाजूने विराट कोहली एक बाजू धरून होता. मात्र 76 धावावर तो आऊट झाला. विराटने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यानंतर रविंद्र जडेला 2 धावावर आऊट झाला. आणि हार्दिक पंड्या 5 धावावर नाबाद राहिला. 

हे ही वाचा : 'या' कुटुंबियांना मिळणार 3 मोफत सिलेंडर, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचे निकष काय?

या धावांच्या बळावर टीम इंडीयाने 7 विकेट गमावून 176 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचे आव्हान असणार आहे. आता हे आव्हान पुर्ण करून दक्षिण आफ्रिका वर्ल्ड़ कपवर नाव कोरते की टीम इंडिया विजय मिळवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT