Hardik Pandya: कर्णधारपदाने दिली हुलकावणी; पंड्या म्हणाला, “कधी कधी मेंदूला...”

मुंबई तक

ADVERTISEMENT

हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवची टी२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमारला देण्यात आली संधी

point

हार्दिक पंड्या फिटनेसबद्दल काय बोलला?

point

टी२० संघाच्या कर्णधारपदासाठी पंड्याचे नाव आघाडीवर होते

Hardik Pandya Latest News : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा १८ जुलै रोजी झाली. श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आले आहे. एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यात टी२० संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचे नाव सर्वात आघाडीवर होते. पण, त्याला उपकर्णधारही करण्यात आलेले नाही. यानंतर आता पहिल्यांदाच हार्दिक पंड्याने मौन सोडले आहे. (What is Hardik Pandya's first reaction after Suryakumar Yadav became the captain of the T20 team?)

हार्दिक पंड्या सध्या क्रिकेट आणि कुटुंब अशा दोन आघाड्यांवर समस्यांना सामोर जात आहे. अलिकडेच हार्दिक पंड्याने पत्नी नताशापासून विभकत् होत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे त्याला कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची चर्चा असतानाच कर्णधारपदाने हुलकावणी दिली. 

कर्णधारपदाची संधी गेल्यानंतर हार्दिक पंड्या काय बोलला?

हार्दिक पंड्या ‘खेल परिधान ब्रॅण्ड’च्या अनावर प्रसंगी उपस्थित होता. यावेळी त्याला भावना व्यक्त केल्या, पण कर्णधारपदाबद्दल बोलणे टाळले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही...”, प्रसाद लाडांचा जरांगेंना मोठा प्रस्ताव 

हार्दिक पंड्या म्हणाला, “जेव्हा आपले शरीर थकत नाही, तेव्हा आपला मेंदू थकतो. त्यामुळे आयुष्यात अनेकदा मी माझ्या सीमा वाढण्यास सक्षम राहिलो. हे तेव्हा झाले जेव्हा माझा मेंदू थकतो, पण माझे शरीर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत राहते.”

हेही वाचा >> हार्दिक पंड्याला डावलून सूर्यकुमार यादवला का केलं कर्णधार?

पंड्या पुढे म्हणाला, “जर तुम्ही २०-२० अशा प्रमाणात प्रयत्न करता, तेव्हा दोन्हींमध्ये अंतर राहत नाही. पण, मी २५ टक्के प्रयत्न करतो आणि स्वतःलाच आव्हान देतो की, पुढच्या वेळी २५ टक्के प्रयत्न करेन. त्यानंतर ३० टक्के प्रयत्न करेन”

ADVERTISEMENT

मेंदूला आराम देणंही महत्त्वाचे -हार्दिक पंड्या

“कधी कधी आपल्या मेंदूला कोणत्याही विचारांशिवाय ठेवणं खूप महत्त्वाचे असते. जेव्हा माझा ट्रेनर मला १० पुशअप करायला सांगतो, तेव्हा मी नेहमी १५ पुशअप करतो. त्यामुळे माझा स्टॅमिना वाढला आहे. मला वाटतं की, जो कुणी फिटनेस रुटीन सुरू करणार आहे, त्याने याकडे लक्ष्य केंद्रीत केलं पाहिजे”, असे हार्दिक पंड्याने सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT