घरात लागतं भांड्याला भांडं! प्रत्येक वेळी नुसतीच भांडणं..काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या

Astrology Tips In Marathi : घरगुती तणाव, वादविवाद आणि सतत खराब होणारे उपकरण भविष्यात मोठ्या संकटांचा इशारा देऊ शकतात. ज्योतिष आणि वास्तू तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या समस्यांकडे दुर्लक्ष करणं महाग पडू शकतं.

Astrology Tips In Marathi (फोटो - AI)

Astrology Tips In Marathi (फोटो - AI)

मुंबई तक

• 07:11 AM • 21 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

घरात तणाव आणि नकारात्मक परिस्थिती आहे का?

point

सतत खराब होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच बदला

point

कुटुंबात विनाकारण भांडण होत असेल तर काय कराल?

Astrology Tips In Marathi : घरगुती तणाव, वादविवाद आणि सतत खराब होणारे उपकरण भविष्यात मोठ्या संकटांचा इशारा देऊ शकतात. ज्योतिष आणि वास्तू तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या समस्यांकडे दुर्लक्ष करणं महाग पडू शकतं. जाणून घ्या अशा गोष्टींच्या मागे कोणती कारणे असतात? हे संकट दूर करण्याचे उपाय कोणते? याबाबत जाणून घ्या.

हे वाचलं का?

ज्योतिष आणि वास्तू तज्ज्ञ शैलेंद्र पांडे यांच्या माहितीनुसार, घरात असलेल्या काही सामान्य समस्या नकारात्मक उर्जा वाढवू शकतात आणि जीवनात अनेक प्रकारची संकटं आणू शकतात. अशा पाच प्रमुख समस्या आणि त्यांच्यावर कोणते उपया करावेत,जाणून घ्या.

घरात तणाव आणि नकारात्मक परिस्थिती

घरात प्रवेश केल्यानंतर मन अस्वस्थ आणि अशांत होतं. हे नकारात्मक उर्जेचं संकेत आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ही स्थिती गुरू ग्रहाच्या कमकुवतपणामुळे निर्माण होऊ शकतं.

उपाय : प्रत्येक संध्याकाळी पूजास्थळी तूप किंवा तेलाचा दिवा पेटवा. संपूर्ण घरात धूप किंवा अगरबत्ती लावल्याने नकारात्मक उर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक उर्जा येते. 

हे ही वाचा >> Viral Video: पार याड लागंल.. पोलीस मॅडमचा डान्स तर बघा, विषयच खल्लास!

सतत खराब होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू

घरात फ्रिज, टीव्ही, बल्ब किंवा ट्यूबलाईट पुन्हा पुन्हा खराब होत असतील, तर ते राहुच्या दुष्प्रभावाचं संकेत होऊ शकतं. या स्थितीमुळे भविष्यात वाईट घटना घडू शकते.

उपाय : घरातील प्रत्येक रुममध्ये लाल रंगांचं स्वस्तिक लावा. तसच घरात साफसफाईकडे विशेष लक्ष द्या. घरात घाण कचरा साचू देऊ नका. 

कुटुंबात विनाकारण भांडण

जर घरात आई-वडिल, भाऊ-बहिण किंवा अन्य सदस्यांमध्ये विनाकारण भांडण होत असेल, तर हे मंगल ग्रहाच्या दोषाचं संकेत आहे. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

उपाय : घरात सूर्याच्या प्रकाशाची पर्यायी व्यवस्था करा. प्रत्येक शनिवारी कुटुंबाच्या सदस्यांसोबत सुंदरकांडचं जतन करा. यामुळे मंगलदोष निघून जाईल.

हे ही वाचा >> चितळे बंधू मिठाईवालेंची फसवणूक! बाकरवडीची चव बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, कसा झाला पर्दाफाश?

पैशांचं नुकसान किंवा चोरी

जर घरात पैसै गायब होत असतील, रस्त्यावर पडत असतील किंवा चोरी होत असेल, तर हे शनी ग्रहाच्या दुष्प्रभवाचं संकेत असू शकतं. 

उपाय : रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपट्याजवळी तुपाचा दिवा लावा. जर तुळशीचं रोपटं नसेल, तरीही दिवा नक्की लावा. तसच गरिबांना दान करा.

    follow whatsapp