Vastu Tips: एके दिवशी राजू त्याच्या घराच्या दाराजवळ उभा होता आणि विचार करत होता, "मला घरात इतकी नकारात्मक ऊर्जा का जाणवत आहे? सगळं काही व्यवस्थित चालायला हवं होतं, पण काहीतरी अडचण आहे." त्याच वेळी त्याच्या घराच्या शेजारील मोहित त्याच्या घराजवळ आला. मोहितने हसत राजूला विचारले, "राजू, तु इतका अस्वस्थ का दिसतोयेस? काय झालं? सांग."
ADVERTISEMENT
यावर राजू म्हणाला, "मला असं वाटतंय की माझं घर आनंदी नाहीये. घरातला आनंद आणि शांती कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय." हे ऐकून मोहित राजूच्या घरात गेला आणि तेव्हाच त्याने त्याच्या घरात अस्ताव्यस्त वस्तू आणि एक मूर्ती पाहिली. त्यावेळी त्याने राजूला विचारले, या सगळ्या वस्तू आणि मूर्ती अशा का ठेवल्या आहेत? या प्रश्नावर राजूने अगदी उत्सुकतेने विचारले, "मग या वस्तू ठेवण्याची काही खास पद्धत आहे का?"
यावर मोहितने राजूला एका वास्तू ज्योतिषा बद्दल सांगितले. दुसऱ्याच दिवशी राजू त्या वास्तू ज्योतिषांकडे गेला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे उपाय केले. काही दिवसांनंतर त्याला सकारात्मक बदल जाणवू लागले.
याबद्दल प्रसिद्ध वास्तुशास्त्र तज्ज्ञ कमल नंदलाल यांनी 'अॅस्ट्रो तक' वर एक खास वास्तु उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहील. या उपायाबद्दल जाणून घ्या.
ज्योतिषी कमल नंदलाल यांचं मत
कमल नंदलाल यांच्या मते, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पारापासून बनवलेली भगवान विष्णू, नारायण किंवा श्रीकृष्णाची 1.25 इंच इतकी मूर्ती ठेवणे खूप शुभ आहे. ही मूर्ती अशा प्रकारे स्थापित करा की ती मुख्य दरवाजातून दिसेल आणि तिचा मागचा भाग बाहेरच्या दिशेने असेल. मूर्ती एका भांड्यात ठेवा आणि तिच्याभोवती 12 झिरकॉन (zircon) दगड कोरड्या स्वरूपात ठेवा. हा उपाय देवी लक्ष्मीला तुमच्या घरात आकर्षित करण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं गेलं आहे.
हे ही वाचा: Astro Tips: करिअरमध्ये यश मिळत नाही? आठवड्यातून एकदा करा 'हा'उपाय
मुख्य प्रवेशद्वारसाठी वास्तू टिप्स
मुख्य दरवाजाचा आकार: घरातील इतर दरवाज्यांपेक्षा मुख्य दरवाजा मोठा असावा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मी सहजपणे प्रवेश करू शकेल.
दिशानिर्देशाचे महत्त्व: घराच्या मालकाच्या जन्मकुंडलीनुसार घराची दिशा शुभ असावी. वास्तु आणि ज्योतिषशास्त्र यांचा एकमेकांशी खोल संबंध आहे. म्हणून दक्षिण दिशा नेहमीच अशुभ किंवा उत्तर दिशा नेहमीच शुभ असते, असे काही नाही.
सरळ दरवाजे टाळा: मुख्य दरवाजा आणि शेवटचा दरवाजा सरळ रेषेत नसावा. यामुळे अन्यथा सकारात्मक ऊर्जा लवकर बाहेर पडू शकते. जर घरातील मुख्य आणि शेवटचा दरवाजा सरळ दिशेत असेल तर क्रिस्टल बॉल किंवा पडद्यांचा वापर करा.
शौचालयापासून अंतर: शौचालय मुख्य दरवाजासमोर नसावे कारण ते नकारात्मक उर्जेला आमंत्रण देते. जर असेल तर त्याठिकाणी क्रिस्टल बॉल बसवा किंवा शौचालयाचा दरवाजा बदला.
शुभ चित्रे आणि चिन्हे: मुख्य दरवाजासमोर शुभ चित्रे, स्वस्तिक किंवा समृद्धीचे प्रतीक ठेवा. धबधबा किंवा मत्स्यालय यांसारखे चित्र देखील शुभ असतात. मुख्यत: अशी चित्रे घराच्या आतील दिशेस लावावी.
पायऱ्यांपासून सावधान: जर तुमच्या मुख्य दराच्या समोरच पायऱ्या असतील तर तुमच्या नशीबात चढ-उतार येऊ शकतात. यासाठी फेंगशुईच्या बॅकवर्ड आरश्याचा वापर करावा.
हे ही वाचा: Astro Tips: कपाळावर तीळ म्हणजे.. तुमच्या नशिबात नेमकं काय असतं?
कमल नंदलाल यांचा संदेश
कमल नंदलाल यांच्या मते, या सोप्या वास्तु उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणू शकता. त्यांच्या म्हणण्यानुसार, घराचा मुख्य दरवाजा केवळ प्रवेशाचा मार्गच नाही तर तो समृद्धी, आनंद आणि शांतीचा प्रवेशद्वार देखील आहे. त्यामुळे या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे.
ADVERTISEMENT
