Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसात वातावरणात उष्णता चांगलच वाढल्याचं दिसतंय. तर काही भागांवर अवकाळीचं सावट आहे. हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात आज हवामानात मिश्र स्वरूप दिसून येणार आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचे संकेत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
उष्णतेची लाट आणि यलो अलर्ट
हे ही वाचा >> रिक्षा चालकाची मुलगी ते महाराष्ट्राची पहिली मुस्लिम महिला IAS,अदिबा अहमदची मार्कलिस्ट पाहिली का?
विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अकोला मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या भागांना उष्णतेच्या लाटेमुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचा आणि पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पावसाचे संकेत
हे ही वाचा >> वडिलांनी विकलेल्या जमिनीचं पोरानं आज सोनं केलं, 35 चेंडूत शतक ठोकणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीचा इशारा देण्यात आलेला असताना आजही काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
