Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार घरात सकारात्मकता आणि समृद्धी आणणारी सर्वात शुभ वस्तू म्हणजे 'तुळशीचे रोप' असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. घरात तुळशीचे रोप असणे हे सुख, शांती आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. यासोबतच, तज्ज्ञांनी तुळशीच्या रोपाची योग्य काळजी आणि ठेवण्याच्या पद्धतींबाबत काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
वास्तू तज्ज्ञांच्या मते, तुळशीचे रोप हे घराच्या ईशान्य दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते, कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. तुळशीमुळे घरात नकारात्मकता दूर होते आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. तुळशीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे, कारण ती हवा शुद्ध करते आणि तणाव कमी करते.
हे ही वाचा>> Astro Tips: रस्त्यावर पडलेली नोट किंवा नाणी उचलावी का... शुभ असतं की अशुभ?
तुळशी रोपासंबंधी वास्तू टिप्स:
स्थान: तुळशीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला किंवा घराच्या अंगणात लावावे. ही दिशा प्रकाश आणि ऊर्जेसाठी सर्वोत्तम मानली जाते.
देखभाल: रोपाला नियमित पाणी द्यावे आणि त्याची पाने कोमेजणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोमेजलेली तुळस अशुभ मानली जाते.
सजावट: तुळशीला लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कुंडीत लावावे, कारण हे रंग समृद्धीचे प्रतीक आहेत.
प्रकाश: रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करावी, परंतु थेट उष्णतेपासून त्याचे संरक्षण करावे.
पूजा: दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करून दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते.
वैज्ञानिकदृष्ट्याही तुळस फायदेशीर
वैज्ञानिकदृष्ट्याही तुळस ही फायदेशीर आहे. ते ऑक्सिजन पुरवते आणि वातावरण शुद्ध करते, ज्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते. घरातील अंगणात तुळशीचे रोप असणे हे प्रत्येकासाठी शक्य नसेल, तर छोट्या कुंडीतही ते लावता येते.
हे ही वाचा>> काच फुटणं शुभ की अशुभ? खरं काय ते समजल्यावर तुम्हालाही...
तुळशीचे रोप छोट्या घरातही कुंडीत लावता येते. त्याची योग्य काळजी घेतल्यास ते घराला शुभता आणि शांती देते. वास्तू तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुळस लावल्यास त्याचा आपल्याला सकारात्मक परिमाण हा आपल्या घरात जाणवू शकतो. वास्तू शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तुळशीचे रोप आणि त्याची काळजी ही समृद्धीची गुरुकिल्ली ठरू शकते.
टीप: टीप: मुंबई Tak ची ही माहिती ज्योतिषशास्त्र आणि त्याभोवती असलेल्या श्रद्धा आणि युक्तिवादांवर आधारित आहे. मुंबई Tak अशा समजुती आणि उपायांचे समर्थन करत नाही.
ADVERTISEMENT
