Sangram Thopate Latest News : पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भारतीय जनता पक्षात प्रेवश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. भाजपात सामील होण्याच्या चर्चेनंतर थोपटे यांनी आज शनिवारी राजीनामा दिला. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. थोपटे यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे इमेलद्वारे सोपवला आहे. त्यानंतर थोपटे यांनी भोर येथील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना रविवारच्या रॅलीसाठी आमंत्रित केलं आहे. आता थोपटे काय निर्णय घेणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत संग्राम थोपटे?
संग्राम थोपटे यांचे पिता भोर विधानसभेतून 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे राज्याचे शिक्षणमंत्रीही होते. ते 14 वर्षांपर्यंत राज्य मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत. अनंतराव थोपटे यांच्यानंतर त्यांचा मुलगा संग्राम थोपटेही भोर विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या वेळी विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांचा नाव खूप चर्चेत होता. भाजपमध्ये नवीन जबाबदारी स्वीकारण्याआधी थोपटे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी चर्चा केलीय, अशी सूत्रांची माहिती आहे.
हे ही वाचा >> 'एवढ्या लोकांना धोका देणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा?', मनसेच्या 'त्या' नेत्याच्या तिरक्या विधानाचा अर्थ काय?
संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत रविवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये भोर तालुका काँग्रेस कमिटी, भोर तालुका महिला काँग्रेस कमिटी, भोर तालुका युवा काँग्रेस कमिटी, भोर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, कार्यकर्ते आणि पुणे दिल्हा परिषदेचे सदस्य सामील होणार आहेत.
याचसोबत भोर तालुका पंचायत समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, भोर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, भोर नगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक, गावतील सरपंच आणि उपसरपंच उपस्थित राहणार आहेत. ही बैठक रविवारी 20 तारखेला 11 वाजता अनंतराव थोपटे कॉलेज फार्मसी हॉलमध्ये आयोजित केली जाणार आहे.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान! म्हणाले, "आमच्यातील भांडण किरकोळ..."
ADVERTISEMENT
