माजी नगरसेविकेच्या मुलाकडून तरूणीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार, दोन वेळा करायला लावला गर्भपात

Pune Crime News: आरोपीची आई एका मोठ्या पक्षाची माजी नगरसेविका आहे. जेव्हा पीडितेने हे त्याच्या माजी नगरसेवक आईला सांगितलं, तेव्हा तिला मदत करण्याऐवजी आणखी धमक्या मिळाल्या.

Mumbai Tak

मुंबई तक

01 Apr 2025 (अपडेटेड: 01 Apr 2025, 05:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात माजी नगरसेविकेच्या मुलाचे तरूणीवर अत्याचार

point

अनेकदा अत्याचार करुन पुन्हा पुन्हा गर्भपात

point

पीडितेने माजी नगरसेविकेकडे तक्रार केल्यावर आल्या आणखी धमक्या

Pune Crime News : वडगाव बुद्रुकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माजी भाजप नगरसेवकाच्या मुलानं लग्नाचं आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली. आरोपीने एवढ्यावरच न थांबता गर्भपात तरूणीला करण्यासही भाग पाडलंय. पीडितेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> खोक्या, हरीण, लॉरेन्स ते खून... सुरेश धस यांनी केलेला 'तो' खळबळजनक दावा नेमका काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची 2021 मध्ये आरोपीशी एका जिममध्ये भेट झाली होती. मैत्रीतलं प्रेम वाढत गेलं आणि त्यांचं प्रेमसंबंधात रूपांतर झालं. पुढे प्रेम वाढत गेलं आणि आरोपी मुलगा वारंवार पीडितेच्या घरी जायचा यायचा. आरोपीने जेव्हा लग्नाचा विषय काढला, तेव्हा तो विषय टाळत असायचा. नंतरच्या काळात इतर महिलांशीही त्याचा संबंध असल्याचा संशय पीडितेला आला. तेव्हा त्यांच्यात वाद झाले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर आरोपीने पीडितेला शिवीगाळ आणि मारहाण केली. तेव्हापासून दोघं दूर झाले होते. 

दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये आरोपीने पुन्हा पीडितेशी संपर्क साधला. मात्र, पीडितेनं भेटण्यास नकार दिल्यानं आरोपीने धमक्या दिल्या. आरोपीची आई एका मोठ्या पक्षाची माजी नगरसेविका आहे. जेव्हा पीडितेने हे त्याच्या माजी नगरसेवक आईला सांगितलं, तेव्हा तिला मदत करण्याऐवजी आणखी धमक्या मिळाल्या.

हे ही वाचा >> इफ्तारीचे फळ वाटताना झाला होता वाद, 20 वर्षीय तरूणाला चाकूने भोसकून संपवलं

आरोपीने नंतर तिच्याशी पुन्हा संपर्क साधला, तेव्हा लग्नाचं आश्वासन दिलं. तेव्हा आरोपीने पुन्हा बलात्कार केला. तसंच पीडितेनं असा दावा केला की, आरोपीच्या  कुटुंबाने त्यांच्या लग्नाला विरोध केला. नंतर आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडलं. 2024 मध्ये, पुन्हा अशाच बहाण्यानं  बलात्कार केला. त्यामुळे पीडिता पुन्हा गरोदर राहिली. 

16 फेब्रुवारी 2025 ला, आरोपीने तिला आळंदीमध्ये नेलं आणि तिच्याशी लग्न केले. ती गर्भवती आहे हे माहित असूनही, त्याने तिला मारहाण केली आणि नंतर तिला पाण्यात मिसळून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. पीडिता भीतीन नंतर अहिल्यानगरमध्ये असलेल्या आजीकडे राहायला गेली. 13 मार्चला ती पुण्यात परतली आणि पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

    follow whatsapp