दारू पिताना किरकोळ वाद झाला, पुण्यात टोळक्यानं 60 वर्षाच्या वृद्धाला थेट... आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मलंग मेहबूब कुरेशी यांचा मुलगा सोहेल (वय २८) यांने याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आदिल शेख, आकाश धांडे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:00 PM • 26 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील वानवडी परिसरातील धक्कादायक घटना

point

पोलिसांनकडून आरोपींना अटक

point

दारू पिताना झाला होता किरकोळ वाद

Pune Crime News : वानवडी परिसरात किरकोळ वादातून एका ज्येष्ठ नागरिकाला तीन जणांनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचं नाव मलंग मेहबूब कुरेशी असं असून, त्यांचं वय 60 वर्ष होतं. कोंढव्यातील शिवनेरी नगर परिसरातील ते रहिवासी होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> इन्स्टाग्रामवर हवा करण्यासाठी पठ्ठ्याने थेट शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारालाच धमकी दिली, प्रकरण काय?

मलंग मेहबूब कुरेशी यांचा मुलगा सोहेल (वय २८) यांने याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आदिल शेख, आकाश धांडे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलंग कुरेशी शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वानवडीतील शांतीनगर परिसरातील एका दारूच्या दुकानात गेला होता. तिथं दारू पित असताना त्याचा आरोपींशी किरकोळ कारणावरून वाद झाला. आरोपी शेख, धांडे आणि त्याच्या साथीदाराने कुरेशीला बेदम मारहाण केली.

हे ही वाचा >> पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना मृत्यू झालेल्या आदिल सय्यदच्या कुटुंबाच्या मदतीला धावले DCM शिंदे

आरोपींनी मलंग कुरेशीला बेदम मारहाण करत दुकानाच्या लोखंडी दारावर ढकललं. यामध्ये कुरेशीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वानौरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

फरार आरोपी शेख आणि धांडे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपीसोबत पांडा नावाचा एक व्यक्ती होता. त्याचा शोध सुरू आहे.

    follow whatsapp