आधी लोकांना एकत्र केलं अन् धडाधड घातल्या गोळ्या... दहशतवादी हल्ल्याचा सगळ्यात पहिला Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

जम्मू-काश्मीरमधील पहलगम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने सर्व देशवासियांना मोठा धक्का बसला आहे. आता या घटनेचा एक एक्सक्लूसिव व्हिडीओ समोर आला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पहिला व्हिडीओ व्हायरल

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पहिला व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

24 Apr 2025 (अपडेटेड: 24 Apr 2025, 03:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पहिला व्हिडीओ व्हायरल

point

दहशतवाद्यांनी कसा केला पर्यटकांवर हल्ला?

point

व्हिडीओत पाहा, नेमकं काय घडलं?

First Video of Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने सर्व देशवासियांना मोठा धक्का बसला आहे. आता या घटनेचा एक एक्सक्लूसिव व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दहशतवादी लोकांवर गोळीबार करत असताना स्पष्टपणे दिसत आहेत. 

हे वाचलं का?

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित (ऑटोमॅटिक) शस्त्रे आहेत आणि ते पहलगामच्या मैदानात पर्यटकांवर हल्ला करत आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना ठार मारले आणि अनेकांना गंभीर जखमी केले.

दहशतवाद्यांच्या हातात ऑटोमॅटिक गन

सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी स्थानिक काश्मिरी दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांसह परिसराची संपूर्ण माहिती गोळा केली होती. सुरक्षित दलांपासून दूर असल्याकारणाने दहशतवाद्यांनी या परिसराची निवड केली होती.

थरकाप उडवणाऱ्या हल्ल्याचा पहिला VIDEO

हे ही वाचा: "अपघातातून वाचल्यावर म्हणाले होते दुसरा जन्म मिळाला, दहशतवाद्यांनी तो सुद्धा हिरावून घेतला"

शरीरावर लावलेले कॅमेरे

दहशतवाद्यांनी आपल्या शरीरावर कॅमेरे लावले होते आणि त्यांनी संपूर्ण हल्ल्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं होतं, असं सुरूवातीच्या तपासात समोर आलं होतं. दहशतवाद्यांनी क्रूरपणे पुरुष आणि महिलांना वेगळे केले आणि नंतर अतिशय निवडकपणे लोकांना ठार मारले. काही लोकांना दुरून गोळ्या घालण्यात आल्या, तर काहींना जवळून गोळ्या घालण्यात आल्या.

सुरक्षा दलांपासून दूर असलेला परिसर निवडला

तपासात असेही समोर आले आहे की दहशतवाद्यांनी जाणूनबुजून पहलगाम हे ठिकाण निवडले कारण तेथे सुरक्षा दलांची तैनाती कमी होती आणि हल्ल्यानंतर बचाव कार्यात वेळ लागला असता. दहशतवाद्यांनी घनदाट जंगलात लपण्याची ठिकाणे बनवली होती आणि स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने त्यांनी आता त्यांचे स्थान बदलले असावे.

हे ही वाचा: "आणखी 15 मिनिट थांबलो असतो तर...", नांदेंडचं जोडपं काश्मीरमधून काय म्हणालं?

पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 17 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला पहलगामच्या बैसारनच्या खोऱ्यात झाला. यावेळी दहशतवाद्यांनी निवडक लोकांनाच ठार मारले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आणखी संतप्त आणि दुःखी झाले आहेत.

    follow whatsapp