Fact Check of Lieutenant Vinay Viral Video: पहलगाम: 22 एप्रिल म्हणजेच मंगळवारी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी कहरच केला. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात हरियाणाच्या विनय नरवाललाही आपला जीव गमवावा लागला. विनय नौदलात लेफ्टनंटच्या पदावर कार्यरत होता. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचं सांगत आहेत. मात्र, खरं काय ते वेगळंच आहे. कारण, या व्हिडीओमध्ये दिसणारं जोडपं हे विनय आणि त्यांची पत्नी नाहीतच.
ADVERTISEMENT
विनयच्या कुटुंबीयांनी घेतला आक्षेप
विनयच्या कुटुंबीयांनी या व्हायरल व्हिडिओ बाबतीत खरं काय ते सांगितलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की या व्हिडिओमध्ये दिसणारे लोक विनय आणि त्याची पत्नी नाहीत. व्हिडीओतील लोकांबद्दल खोटी माहिती सांगून हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. असा विनयच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. खरंतर, इंफ्लूएंसर यशिका शर्मा आणि आशिष सेहरावत यांनी व्हायरल व्हिडिओचे सत्य सर्वांसमोर आणलं आहे.
हे ही वाचा: 'टिकली काढून फेकली, अल्ला हू अकबर म्हणाली तरी माझ्या नवऱ्याला...' कौस्तुभच्या पत्नीचा पवारांसमोरच टाहो
यशिका आणि आशीष यांनी केला खुलासा
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंफ्लूएंसर यशिका शर्मा आणि आशिष सेहरावत यांनी याबद्दल खुलासा केला. त्यांने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि सांगितलं की हा 19 सेकंदांचा व्हिडिओ लेफ्टनंटचा नसून त्यांचा म्हणजेच यशिका आणि आशीषचा आहे. दोघांनीही सोशल मीडियावर लोकांना आवाहन केले आणि म्हटले की आम्ही लेफ्टनंट विनय नरवाल यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. पण कृपया आमचा व्हिडिओ खोट्या माहितीसह पसरवू नका.
'आम्ही तिथे नव्हतो म्हणून वाचलो'
व्हिडिओच्या सुरुवातीलाच इंफ्लूएंसर अभिनेत्री यशिका शर्मा म्हणाल्या, 'आम्ही जिवंत आहोत, कारण आम्ही तिथे नव्हतो. कोणत्या माध्यमातून, कुठून, कोणत्या चॅनेल्सवरुन फक्त आमचेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत? याबद्दल आम्हाला माहित नाही."
ADVERTISEMENT
