ज़का खान, बुलढाणा: बुलढाणा सरकारी रुग्णालयात गर्भवती महिलेची सोनोग्राफी ही प्रचंड चर्चेत आली आहे. जेव्हा डॉक्टरांनी सोनोग्राफी बारकाईने तपासली तेव्हा त्यांनाही धक्का बसला, कारण गर्भवती महिलेच्या गर्भाशयात बाळ दिसत होते. तसेच, या बाळाच्या पोटात देखील आणखी एक बाळ दिसत आहे.
ADVERTISEMENT
बाळाच्या पोटात आणखी एक बाळ, अत्यंत दुर्मिळ घटना
खरं तर, दोन दिवसांपूर्वी, जिल्ह्यातील मोताळा येथील एका गावातील 9 महिन्यांची गर्भवती असलेली महिला (वय 32 वर्षे) ही सरकारी रुग्णालयात पोहोचली. तिथे डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी गर्भवती महिलेची सोनोग्राफी केली. सोनोग्राफी करताना त्यांना त्या महिलेच्या पोटात एक बाळ दिसले आणि त्यासोबतच त्यांना त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ दिसले.
हे ही वाचा>> Health Fitness : उलटं चालण्यामुळे हाडे मजबूत होतात? समज की गैरसमज? वाचा सविस्तर...
यामुळे जेव्हा डॉ. अग्रवाल यांनी त्या महिलेची आणखी तीन वेळा सोनोग्राफी केली तेव्हा त्यांना आढळले की तिच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ आहे.
डॉ. अग्रवाल यांनी हे त्यांच्या वरिष्ठांना सांगितले. प्रसूतीदरम्यान कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून वरिष्ठांनी गर्भवती महिलेला संभाजीनगरला पाठवले.
हे ही वाचा>> काय हा प्रकार... अंतर्वस्त्रावर तरुणी-तरुणांचा मेट्रोमधून प्रवास
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांना विचारण्यात आले की, महिलेला आणि तिच्या गर्भाशयातील बाळाला काही नुकसान होण्याचा धोका असू शकतो का? यावर डॉक्टरांनी सांगितले की महिलेला कोणताही त्रास होणार नाही. परंतु प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळावर लवकर उपचार न केल्यास त्याची वाढ खुंटू शकते.
सिव्हिल सर्जन डॉ. भागवत भुसारी म्हणाले की, वैद्यकीय भाषेत याला गर्भातील गर्भ म्हणतात. जगात असे सुमारे 200 प्रकरणं समोर आली आहेत, त्यापैकी 15 ते 20 प्रकरणं ही आतापर्यंत भारतात नोंदवली गेली आहेत.
ADVERTISEMENT
