विक्रांत चव्हाण, भिवंडी :
ADVERTISEMENT
Eid-e-Milad Youth Death: दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई लगतच्या भिवंडी (Bhiwandi) परिसरात ईद मिलाद-उन-नबीच्या (Eid-e-Milad-un-Nabi) शुभमुहूर्तावर रझा अकादमीच्या माध्यमातून भिवंडी शहरातील कोटर गेट येथून 19वी वार्षिक ईद मिलाद-उन-नबी मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली होती. पवित्र कुराण पठणाने मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत यावेळी लाखो लोक सहभागी झाले होते. पण याच वेळी एक अशी दुर्घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण भिवंडी हादरून गेलं आहे. (a young man died due to electric shock while hoisting the flag during the eid milad un nabi procession in bhiwandi)
दरम्यान, भिवंडी शहरातील पिराणी पाडा परिसरातून ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत सामील होण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण हे हातात उंच झेंडे घेऊन घोषणाबाजी करत होते. यावेळी तरुणांच्या हातात 20 ते 25 फूट लांबीचा मोठा लोखंडी रॉड होता. हाच रॉड अचानक वरून जाणऱ्या 21000 हजार हाय पॉवर वायर लाईनला धडकली. जो रस्त्याच्या मधोमध जमिनीपासून 25 फूट वर होता. रॉड जेव्हा विद्युत तारेच्या संपर्कात आला तेव्हा त्यांच्या करंटने एक तरुण गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
अशफाक शेख असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय २१ वर्ष होतं. तो मूळचा सुलतानपूर, उत्तर प्रदेशचा रहिवासी होता आणि व्यवसायाने टेलरिंगचे काम करत होता. या अपघातामुळे संपूर्ण मिरवणुकीत शोककळा पसरली. तसंचे हे वृत्त पसरताच संपूर्ण भिवंडीत अनेकांना धक्का बसला.
हे ही वाचा : MNS : मुलुंड प्रकरणानंतर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून फटकारले, ‘राजधानी हातातून गेली…’
घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घटनास्थळाचा सविस्तर चौकशी केली. ही घटना नेमकी कशी घडली याचाही पोलीस आता तपास करत आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या लोकांमार्फत संबंधित मुलाला इशाराही दिला होता की, खाली हायटेंशन वायर आहे त्यामुले एवढा मोठा लोखंडी रॉड येथून घेऊन जाऊ नको, परंतु लोकांच्या म्हणण्याकडे त्याने सपसेल दुर्लक्ष केलं.. ज्यामुळे त्याला त्याचा हकनाक जीव गमवावा लागला.
या अपघाताचे दोन वेगवेगळे लाइव्ह व्हिडीओ देखील समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अशफाक शेख ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत सामील होऊन एक लांबलचक रॉड वापरून ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करत होता. ज्याची लांबी 20 ते 25 फूट इतकी आहे. पण अचानक अस्पाक सेखच्या हातात असलेला रॉड हा हाय टेंशन वायरवर आदळला.
हे ही वाचा : October महिन्याची सुरुवात पुन्हा सुट्ट्यांपासून… बॅंकेत 16 दिवस कामकाज राहणार बंद!
त्याचवेळी विजेचा जोरदार धक्का लागल्याने अशफाक शेख जमिनीवर कोसळला. या अपघातानंतर आजूबाजूला उभे असलेले लोक जमा झाले. आणि त्यांनी अशफाक शेखला उचलण्याचाही प्रयत्न केला, पण त्यावेळी अशफाकची कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू नव्हती.
टेरेसवरून काढलेल्या एका व्हिडीओमध्ये अशफाकला विजेचा धक्का लागल्याचा स्पष्टपणे दिसत आहे.
ADVERTISEMENT