Chandigarh Mayor : चंदीगड महापौर पदाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असतानाच सर्वोच्च न्यायालयाकडून (supreme court) आज ऐतिहासिक निकाल देण्यात आला आहे. न्यायालयाने जुने निर्णय फेटाळत आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. चंदीगड महानगरपालिकेच्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेली सर्व 8 मतं वैध ठरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बॅलेट पेपरवरची ही सर्व ही मतं रिटर्निंग ऑफिसरकडून बाद ठरवण्यात आली होती.
ADVERTISEMENT
कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह
सरन्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी करताना सांगितले होते की, ती सर्व 8 मतं ही याचिकाकर्ते उमेदवार कुलदीप कुमार यांच्या बाजूची आहेत. या प्रकरणात रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करून अनिल मसिह यांना याबाबत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार असाही इशारा त्यांनी दिला होता.
अधिकाऱ्यावर कारवाई करा
रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिहने 8 बॅलेट पेपरवर करण्यात आलेली मतांवर खाडाखोड केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर जात हे त्यांनी काम केलं होते. त्यामुळे रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिहवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई करा असे आदेश दिले आहेत.
व्हिडीओ रेकॉर्डिंग मागितली
सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर रिटर्निंग ऑफिसरने सोमवारी कबुली दिली होती की त्यांनीच बॅलेट पेपरवर खाडाखोड केली होती. रिटर्निंग ऑफिसरची चौकशी केल्यानंतर कोर्ट रूममध्ये पोहोचलेल्या निवडणुकीशी संबंधित सगळे मूळ व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि कागदपत्रंही मागितली होती. या प्रकरणातील रिटर्निंग ऑफिसरचे व्हिडीओ आणि बॅलेट पेपरही आता जमा करण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयातही आव्हान
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली. आम आदमी पक्षाचे (आप) नगरसेवक कुलदीप कुमार यांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणजेच रिटर्निंग ऑफिसरच्या 8 मते अवैध ठरविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले होते, त्यामुले अनेकांच्या नजरा या निर्णयाकडे लागल्या होत्या.
हे ही वाचा >> भाजपला सुप्रीम कोर्टाचा झटका! विनोद तावडेंची रणनीती फसली
सत्य दाबण्याचा प्रयत्न
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलदीप कुमार यांनी सांगितले की, 'या निर्णयामुळे मला न्यायालयाचे आभार मानायचे आहेत. सत्य हे काही काळासाठी त्रासदायक ठरू शकते, मात्र ते कोणीही दाबू शकत नाही. या निर्णयामुळे सत्याचा नेहमीच विजय होतो असा विश्वसाही त्यांनी बोलून दाखवला. या निर्णयामुळे चंदीगडमध्ये रखडलेली विकासकामं माझ्याकडून आधी पूर्ण केली जातील. या निर्णयामुळे एक सिद्ध झालं की, 'सर्वोच्च न्यायालयाकडून लोकशाहीची हत्या होऊ दिली नाही. त्यामुळे आगामी काळात आमचेच उमेदवार नक्कीच विजयी होऊन परततील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकशाहीची थट्टा
महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेवर सोमवारी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रशासन आणि निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना चांगलेच फटकारले होते. याबाबत त्यांनी त्यांच्या टिप्पणी म्हटले होते की, 'तुम्ही ही लोकशाहीची थट्टा केल्याचे त्यांनी म्हटले होते.'
ADVERTISEMENT