Anant Ambani : जामनगर ते द्वारका..वाढदिवसानिमित्त अनंत अंबानी करतायत 170 किमीची पदयात्रा! काय आहे पदयात्रेचं महत्त्व?

Anant Ambani Padyatra : आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानीची गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा रंगली आहे.

Anant Ambani Padyatra Update

Anant Ambani Padyatra Update

मुंबई तक

• 10:31 PM • 04 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

किती लांब आहे पदयात्रेचा प्रवास?

point

अनंत अंबानी का करत आहेत पदयात्रा?

point

काय आहे पदयात्रेचं महत्त्व?

Anant Ambani Padyatra : आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानीची गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा रंगली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे डायरेक्टर अनंत अंबानी यांनी नुकतीच एक पदयात्रा सुरु केली आहे. ते जामनगर पासून भगवान श्रीकृष्ण नगरी द्वारकापर्यंत पदयात्रा करत आहेत. यावेळी त्यांनी 30 वा जन्मदिन खास अध्यात्मिक पद्धतीत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनंत अंबानी 170 किलोमीटरची पदयात्रा करत आहेत. 29 मार्चपासून अंबानी यांनी ही पदयात्रा सुरु केली होती. अनंत अंबानी दररोज 20 किमी अंतर चालत आहेत. 

हे वाचलं का?

किती लांब आहे पदयात्रेचा प्रवास?

अनंत अंबानी यांची पदयात्रा जवळपास 170 किमीची आहे. अंबानींच्या या पदयात्रेला आता सात दिवस पूर्ण झाले आहेत. अंबानी यांच्या यात्रेदरम्यान देवाचे भजन आणि नाम जपलं जात आहे. अनंत अंबानी यांच्या पदयात्रेचा वेग लक्षात घेता ते येणाऱ्या दोन दिवसांत द्वारकापर्यंत पोहचू शकतात. हिंदू धर्मात पदयात्रेला काय महत्त्व आहे, जाणून घेऊयात..

हे ही वाचा >> SSC Exam 2025 Result Date : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल

अनंत अंबानी का करत आहेत पदयात्रा?

पदयात्रा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. पद म्हणजे पाय आणि यात्रा म्हणजे प्रवास. हिंदू धर्मात पदयात्रेला विशेष महत्त्व आहे. एखाद्या मंदिरापर्यंत पायी चालणं म्हणजे भक्ती समर्पणचं प्रतिक मानलं जातं. अंबानी कुटुंब सुरुवातीपासूनच भगवान द्वारकाधीशचे परमभक्त राहिले आहेत. प्रत्येक शुभकार्याआधी ते देवाचे दर्शन नक्कीच घेतात. या पदयात्रेचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अनंत अंबानी यांचा जन्मदिवस..10 एप्रिलला अनंत अंबानी 30 वर्षांचे होणार आहेत. या खास दिनी अनंत अंबानी भगवान द्वारकाधीश यांचं दर्शन घेऊन पदयात्रेची सांगता करणार आहेत. 

हे ही वाचा >> बंद खोली दोन तरुणी आणि आत रेल्वे कर्मचारी... अधिकाऱ्याच्या बायकोला WhatsApp वर पाठवले न्यूड फोटो

काय आहे पदयात्रेचं महत्त्व?

अनेक लोकांचं म्हणणं आहे की, एखाद्या पवित्र स्थळापर्यंत पोहोचल्याने आत्मा शुद्ध होते. मानसिक शांती मिळते आणि देवाचा आशिर्वाद प्राप्त होतो. पदयात्रा फक्त यात्राच नाही तर एक अध्यात्मिक प्रवासही आहे. यावेळी एखादा व्यक्ती आस्था, भक्ती आणि आत्मचिंतनाकडे लक्ष केंद्रित करतो. द्वारका नगरीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही भगवान श्री कृष्णाच्या राज्याची राजधानी मानली जाते. 

    follow whatsapp