Barmer Viral News : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक रेल्वे कर्मचारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला. दोन तरुणींनी या रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक करून त्याचं जीवन अडचणीत आणलं. या धक्कादायक घटनेमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. दोन तरुणींनी रेल्वे अधिकाऱ्यासोबत नेमकं काय केलं? या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घ्या सविस्तरपणे..
ADVERTISEMENT
स्टेशनवर तरुणींसोबत झाली ओळख
बाडमेर रेल्वे स्टेशनवर एका अज्ञात तरुणीने रेल्वे अधिकाऱ्याशी संवाद साधला. दोघांमध्ये इतक्या गप्पा रंगल्या की एकमेकांनी मोबाईल नंबरही शेअर केला. त्यानंतर ती तरुणी रेल्वे स्थानकातून बाहेर गेली. परंतु, ही कहाणी इथेच संपली नाही. घरी पोहोचल्यानंतर तिने रेल्वे अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांच्यात बोलणं सुरु झाला. अधिकाऱ्याला तरुणीचं बोलणं आवडलं.
दुसरी मुलगीही या प्रकरणात झाली समील
काही दिवसानंतर त्या तरुणीने तिच्या मैत्रिणीची ओळख रेल्वे अधिकाऱ्यासोबत करून दिली. त्यानंतर दोन्ही मुली या रेल्वे कर्मचाऱ्याशी फोनवरून संवाद साधू लागल्या. कधी तिकीटची माहिती, तर कधी रेल्वे संबंधीत गप्पा या तिघांमध्ये रंगू लागल्या. अधिकाऱ्याला वाटलं की दोन्ही तरुणींसोबत त्याची चांगली मैत्री रंगली. पण या रेल्वे अधिकाऱ्याला माहित नव्हतं की, तरुणींनी त्याच्यासोबत मोठा कट रचला आहे.
हे ही वाचा >> Mangeshkar Hospital: कोण होत्या तनिषा भिसे? पहिलंच बाळंतपण, दोन चिमुकलींना जन्म दिला अन्...
एकट्याला भेटायला बोलावलं आणि...
एक दिवस दोन्ही तरुणींनी त्या रेल्वे अधिकाऱ्याला एका ठिकाणी भेटायला बोलावलं. त्यानंतर त्यांनी मद्यपान करून मौजमजा केली. अधिकारी एवढ्या नशेत होता की, त्याला कळतच नव्हत, नेमकं काय घडत आहे..याचदरम्यान, तरुणींनी संधी साधून रेल्वे अधिकाऱ्याचा विचित्र व्हिडीओ आणि फोटो काढले. जेव्हा अधिकाऱ्याला जाग आली, तेव्हा या तरुणींनी त्याच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली.
पैसे देण्यास नकार दिल्याने त्या मुलींनी या रेल्वे अधिकाऱ्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ त्याच्या पत्नीला मोबाईलवर पाठवले. त्यानंतर अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने विरोध केल्यानंतर तरुणीसोबत आलेल्या दोन तरुणांनी या अधिकाऱ्याला मारहाणही केली. त्यानंतर या रेल्वे अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करून दोन तरुणींना अटक केली. तसच पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा >> Viral News : मला टच करू नको! Honeymoon च्या रात्री बायको नवऱ्यावर भडकली, प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि...
ADVERTISEMENT
