Viral News : मला टच करू नको! Honeymoon च्या रात्री बायको नवऱ्यावर भडकली, प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि...

Groom And Bride Honeymoon Viral News : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील असं प्रकरण समोर आलं आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Couple Honeymoon Night Viral News

Couple Honeymoon Night Viral News

मुंबई तक

04 Apr 2025 (अपडेटेड: 04 Apr 2025, 05:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हनिमूनच्या रात्री पत्नी पतीवर का भडकली?

point

पत्नीने पतीला दिली जीवे मारण्याची धमकी

point

त्या रात्री नेमकं घडलं तरी काय?

Groom And Bride Honeymoon Viral News : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील असं प्रकरण समोर आलं आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. लग्नाच्या काही तासानंतर नवऱ्यासमोर असं सत्य बाहेर आलं, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. सुहागरातच्या दिवशी पत्नीने नवऱ्याला शरिरीक संबंध ठेवण्यास थेट नकार दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे आणि पुढील तपास सुरु आहे.

हे वाचलं का?

लग्नाच्या पहिल्याच रात्री झालं भांडण

बरेलीच्या बारादरी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न 25 जानेवारीला झालं होतं. तरुणाने सांगितलं की, सुहागरात्रीच्या दिवशी जेव्हा तो त्याच्या पत्नीजवळ गेला, तेव्हा तिने थेट नकार दिला. इतकच नव्हे तर पत्नीने धमकी देत म्हटलं की, जर जबरदस्ती केली तर विष पिऊन मरून जाईल आणि संपूर्ण कुटुंबाला बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवेल. धक्कादायक बाब म्हणजे, नवरीने म्हटलं की, तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचं आहे. 

हे ही वाचा >> 10 लाख रुपयांसाठी महिलेला दाखल करून न घेणाऱ्या पुण्यातील दिनानाथ रुग्णलयाचा नेमका इतिहास काय?

प्रियकरासोबत आधीही पळाली होती नवरी

पीडित पतीचं म्हणणं आहे की, त्याच्या पत्नीचा आधीपासूनच त्यांच्या परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याला भेटण्यासाठी ती घरातूनही पळाली होती. कुटुंबियांनी जबरदस्ती तिचं लग्न केलं. परंतु, लग्नानंतर ती तिच्या प्रियकराला विसरली नाही. पतीने जेव्हा हा सर्व प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला, तेव्हा नवरीच्या कुटुंबियांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, नवरीने आत्महत्येची धमकी दिली आणि म्हटलं ती तिच्या प्रियकरासोबतच राहील.

हे ही वाचा >> 4th April 2025 Gold Rate : ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री! एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीचे दर कडाडले

तरुणाने तक्रारीत म्हटलंय की, पत्नीचे कुटुंबिय गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना शिवीगाळ केली आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. माझ्या हृदय विकाराचा त्रास आहे आणि मागील अडीच वर्षांपासून संपूर्ण कुटुंब तणावात आहे. माझी पत्नी फोनवरून माझ्या कुटुंबियांना धमकी देते. 

    follow whatsapp