SSC Exam 2025 Result Date : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल

SSC Exam 2025 Result Date :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. दोन्ही परीक्षा मार्च महिन्यात संपल्या असून आता सर्व विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागलीय ती या परीक्षांच्या निकालाची.

एसएससी सीजीएल टियर १ चा निकाल लवकरच

एसएससी सीजीएल टियर १ चा निकाल लवकरच

मुंबई तक

• 08:36 PM • 04 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा निकाल कोणत्या तारखेला होणार जाहीर?

point

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर

point

शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतिपथावर

SSC Exam 2025 Result Date :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. दोन्ही परीक्षा मार्च महिन्यात संपल्या असून आता सर्व विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागलीय ती या परीक्षांच्या निकालाची. एसएससी परीक्षेबाबत बोलायचं झालं तर,  शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरु आहे. या परीक्षेचा निकाल 15 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. एसएससी परीक्षेचा हा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल असेल, असं म्हटलं जात आहे. 

हे वाचलं का?

राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर घेतले आणि या परीक्षांचा निकालही मे महिन्यातच जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलीय. तसच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षाही घेतल्या जाणार असल्याचं समजते. मागील काही वर्षांत एसएससी आणि एचएससी परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात आले होते.

दहावीची परीक्षा संपली, आता विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागलीय निकालाची

परंतु, आता एसससी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.

हे ही वाचा >> बंद खोली दोन तरुणी आणि आत रेल्वे कर्मचारी... अधिकाऱ्याच्या बायकोला WhatsApp वर पाठवले न्यूड फोटो

अनेक महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतला जातो. तसच इन हाऊस अॅडमिशनही सुरु असतात. त्यामुळे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. कारण निकाल लवकर लागल्यानंतर त्यांना अॅडमिशनच्या प्रोससची तयारी करण्यास अधिक वेळ मिळू शकतो. दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने दोन शाळांची शासन मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशाप्रकारची कारवाई करण्यात आली होती. 

हे ही वाचा >> Viral News : मला टच करू नको! Honeymoon च्या रात्री बायको नवऱ्यावर भडकली, प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि...

    follow whatsapp