Model Viral News: ब्राझिलच्या एका मॉडेल आणि इन्फ्लूएन्सरला पुन्हा व्हर्जिन व्हायचं आहे.या मॉडेलने पुन्हा सर्जरी करून व्हर्जिन होण्याचा निर्णय घेतला आहे. ही महिला या सर्जरीसाठी जवळपास 16 लाख रुपये खर्च करणार आहे. या मॉडेलने म्हटलं की, मला पुन्हा व्हर्जिन व्हायचं आहे आणि यासाठी मी प्लॅनिंग सुरु केली आहे. या महागड्या सर्जरीसाठी 19 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 16 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. या सर्जरीला हायमेनोप्लास्टी असं म्हणतात.
ADVERTISEMENT
धोका पत्करण्यास मॉडेलची तयारी
ब्राझीलच्या 23 वर्षीय तरुणीने जैम प्रेसला सांगितलं की, "मला पुन्हा व्हर्जिन होण्यासाठी एक खास कॉस्मेटिक सर्जरी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया माझ्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. सर्जरी माझ्या व्यक्तीगत आणि पेशेवर जीवनात एका नव्या सुरुवातीचा प्रतीक असेल.
हे ही वाचा >> Optical Illusion : थांबा जरा! कँडी क्रश खेळताय? आधी शोधून दाखवा फोटोत लपलेली चुकीची 'Candy'
हायमेनोप्लास्टी काय आहे?
हायमेनोप्लास्टी नावाच्या प्रक्रियेला हायमेन रिपेयर म्हणूनही संबोधलं जातं. सर्जरीच्या माध्यमातून एक डॉक्टर हायमनला जटिल प्रक्रियेद्वारे टाक्यांनी जोडतो. मॉडेलने सांगितलं की, हे माझ्या आत्मसन्मान आणि व्यक्तीगत कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रक्रियेत मानसिक सुख आहे. एक महिलेला कसं वाटतं आणि तिला तिच्यासाठी काय हवं आहे, हे यातून स्पष्ट होतं.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! 'या' दिवशी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2100?
एका डॉक्टरांनी सूचना देत म्हटलं की, हायमेनोप्लास्टी फक्त एक कॉस्मेटिक सर्जरी आहे. यामुळे पुन्हा व्हर्जिनीटीसारखं फील होत नाही. हे फक्त प्रतिकात्मक आहे आणि या सर्जरीत खूप मोठा धोका आहे. कारण यामुळे निशाण पडण्याची शक्यता असते.या प्रक्रियेदरम्यान आणि नंतर रक्तस्त्रावही होऊ शकतो. हा एक नैतिक प्रश्नही आहे. हा निर्णय सांस्कृतिक आणि मनोवैज्ञानिक प्रक्रियेशीही जोडलेला आहे. दरम्यान, ब्राझिलच्या मॉडेलने तिच्या निर्णयावर ठाम राहण्याचं ठरवलं आहे. तिने म्हटलं, दुर्देवाने कुणीही याप्रकारच्या विकल्पांचं समर्थन करणार नाही. आम्हाला या निर्णयांचा सन्मान करण्याची गरज आहे.
ADVERTISEMENT