सवाई माधोपूर: सध्या, एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही महिला राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील वजीरपूर पोलिस स्टेशनची SHO टिनू सोगरवाल असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस स्टेशन आणि आसपासच्या परिसरात टिनूचा धाकड अंदाज पाहून सर्वचजण थक्क झाले. पोलीस स्टेशनमध्ये टिनूचा धाक असल्याचं सर्वांचं मत आहे. टिनू सोगरवालची अशी स्टाईल सर्वांनी याआधीसुद्धा पाहिली होती. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या डान्सची स्टाईल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लोकांकडून टिनूचे भरभरुन कौतुक केले जात आहे.
ADVERTISEMENT
टिनू सोगरवालच्या या कलेचे खूप कौतुक होत आहे. दरम्यान, SHO टिनूकडे राजस्थानपर्यंत एक पथक पोहोचले. याबद्दल टिनू संवाद साधताना म्हणाली, "जेव्हा मला नाचण्याची संधी मिळते तेव्हा ती मी सोडत नाही." खरंतर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजस्थान पोलिस स्थापना दिनानिमित्त तिथल्या पोलिस लाईनमध्ये आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील होता. या कार्यक्रमात SHO टिनू सोगरवाल हिने केलेल्या नृत्याची सर्वत्र चर्चा आणि प्रशंसा होत आहे.
हे ही वाचा: Anaya Bangar: 'क्रिकेटर्संनी न्यूड फोटो पाठवले अन्', लिंग बदल झालेल्या अनाया बांगर सांगितलं हादरवून टाकणारं सत्य
पोलिस अधीक्षक ममता गुप्ता आणि जिल्हाधिकारी शुभम चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी टिनू सोगरवालच्या या कलेचे कौतुक केले. टीनू सोगरवाल ही जय जय शिव शंकर कांता लागे ना कंकर या गाण्यावर थिरकली.
यापूर्वी सुद्धा टिनूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
याआधीही टिनूचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नुकताच, होळीनिमित्त पोलिस लाईनमध्ये आयोजित होळी मिलन कार्यक्रमात, टिनू सोगरवालने 'खाई के पान बनारसवाला' या गाण्यावर नृत्य केले होते. त्यावेळी, त्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
हे ही वाचा: नव्या नवरीला सोडून 'तो' महिला कॉन्स्टेबलसोबत पळाला! बायकोला म्हणाला, "आम्ही दोघे विष पिऊन..."
टिनूने सांगितलं डान्सच्या व्हिडीओमागचं कारण
'राजस्थान तक'शी झालेल्या संभाषणात टिनूने सांगितले की, नृत्य हा तिचा छंद आहे. यामुळे मी इतकी लोकप्रिय होईन याची मला कल्पनाही नव्हती. बरेच लोक असं नृत्य करतात. पोलिस खात्यात सुद्धा अनेक लोकांनी नृत्य केल्याचे पाहायला मिळते. महिलांना घरातील आणि कार्यलयातील कामकाजाची अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच मी माझ्या घरातील आणि विभागीय कामकाजाची जबाबदारी पार पाडू शकते.
ADVERTISEMENT
