Breaking news in Marathi Online: बुलढाणा: Breaking News Maharashtra Marathi: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) शहराजवळ 1 जुलै रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात (Bus Accident) झाला. ज्यामध्ये बसमधील तब्बल 26 प्रवाशाचा आगीत होरपळून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. (26 passengers Death) खाजगी ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून मुंबईकडे जात असताना अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर लागलेल्या आगीने 26 प्रवाशांचे जीव घेतले. (buldhana bus accident 26 passengers died bus accident on samruddhi highway who exactly traveling list of passengers in bus vidharbha travels nagpur yavatmal wardha)
ADVERTISEMENT
दरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सचा या बसमध्ये बहुतांशी नागपूर, यवतमाळ आणि वर्धा येथील प्रवाशी असल्याच समोर आलं आहे. ज्यापैकी काही प्रवाशांची नावं देखील आता समोर आली आहेत.
बुलढाण्याजवळ झालेल्या अपघातीतल बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावं
- रामदास पोकळे
- करण दुधबावरे
- वृषाली वनकर आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती
- शृजान
- मेघना तायडे
- तेजू राऊत
- संजीवनी घोटे
- आयुष गाडगे
- कौस्तूभ काळे
- सुशील केळकर
- कैलास गंगावणे आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती
- इशांत गुप्ता
- गुडीया शेख आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती
- राजश्री
- योगेश गवई आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती
- राधिका खडसे आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती
- प्रथमेश खोडे
- अवंती पोहणेकर
- निखील पाठे
- शशिकांत गजभिये
हे ही वाचा >> Buldhana: समृद्धी महामार्गावर 26 प्रवाशी जागीच ठार, अपघातानंतर बस जळून खाक
दरम्यान, या अपघातानंतर बसला जी भीषण आग लागली त्यात अनेक प्रवासी हे जळून खाक झाले आहेत. त्यामुळे मृतकांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाला अडथळे येत आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए किट मागविण्यात आल्या असून आता नागपूर फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या भयंकर अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नेमका अपघात कसा झाला?
बुलढाणा एसपी सुनील कडासेन यांनी सांगितले की, बसमध्ये एकूण 33 लोक होते, त्यापैकी 3 चिमुकल्या मुलांसह 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटला आणि बस आधी खांबाला आणि नंतर दुभाजकाला धडकली. ज्यामुळे बसने पेट घेतला.
हे ही वाचा >> VIDEO: Samruddhi Highway Accident: 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, बसने कसा घेतला पेट?
अपघातग्रस्त लक्झरी बस ही नागपूरहून मुंबईकडे जात असताना पिंपळखुटा गावाजवळ पहाटे दीडच्या सुमारास खांबाला धडकून दुभाजकाला धडकली ज्यानंतर तिला आग लागली. दरम्यान, या अपघातात जे 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रवासी नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT