Today Gold-Silver Rate Today: सोन्याच्या भावात मागील दोन दिवसात 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 700 रुपये किलोग्रॅम इतकी दरवाढ झालीय. मागील काही दिवसात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीत पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लग्नसराईत सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतात आज 21 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 76,190 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचा भाव 7619 रुपये आहे. तर 22 कॅरेट गोल्डचा प्रति 10 गॅमचा भाव 69,841 रुपये आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत आज सोन्याचा भाव
मुंबईत आज सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 76190 रुपये आहे. तर काल 20 नोव्हेंबरला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 75790 रुपये आहे. तर सात दिवस आधी 14 नोव्हेंबरला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 74240 रुपये होता.
मुंबईत आज चांदीचे दर
मुंबईत आज चांदीचा भाव 90210 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. तर काल 20 नोव्हेंबरला चांदीचा भाव 90870 रुपये प्रति किलोग्रॅम होता. तसच एक आठवडा आधी चांदीचा भाव 89,090 रुपेय प्रति किलोग्रॅम होता.
हे ही वाचा >> Gautam Adani US Bribe Case : गौतम अदानी आणि पुतण्यातवर लाच दिल्याचे आरोप, अमेरिकेतलं प्रकरण काय?
कोलकातामध्ये आज सोन्याचा भाव
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 75690 रुपये झाला आहे. काल 20 नोव्हेंबरला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 75110 रुपये होता. तर मागील आठवड्यात सोन्याचा भाव 74140 रुपये होता.
दिल्ली
राजधानी दिल्लीत आज 21 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 75660 रुपये आहे. काल 20 नोव्हेंबरला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 75080 इतका होता. तर मागील आठवड्यात सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 74110 रुपये होता.
हे ही वाचा >> Baramati Vidhan Sabha : भाषणाचे अर्थ, बुथवरचा राडा, मतदानाचा टक्का वाढला..'या' गणितामुळे अजितदादांना फायदा?
चेन्नई
चेन्नईत आज 21 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 76410 रुपये आहे. तर काल बुधवारी सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 76010 रुपये होता. मागील आठवड्यात सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 74510 रुपये होता.
ADVERTISEMENT