Manoj Jarange : 'लाडकी बहीण आताच काढायची होती का?', जरांगेंसमोर तरूणी का रडली?

मुंबई तक

20 Jul 2024 (अपडेटेड: 20 Jul 2024, 07:49 PM)

Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या व्यासपिठासमोर येऊन एका मुलीने सरकारकडून काढल्या जाणारे जीआर आणि त्याचा आम्हा मुलांना प्रवेशासाठी होणाऱ्या त्रासाची आपबीती सांगितली.

caste validitiy certificate issue student cry infront of manoj jarange maratha reservation

जरांगेंसमोर एका तरूणीला अश्रू अनावर झाले आहेत

follow google news

बातम्या हायलाइट

point

आम्ही जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढायचे?

point

लाडकी बहीण योजनेने आमचं किती नुकसान होत आहे.

point

मनोज जरांगेंसमोर तरूणीला अश्रू अनावर

Manoj Jarange News : गौरव साळी, जालना : ''सरकारला लाडकी बहीण आताच काढायची होती का? त्याच्यामुळे आमचं कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये, आमची खूप परवड होतेय, असे बोलताना एका तरूणीला अश्रू अनावर झाले आहे. ही तरूणी जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहोचली होती. यावेळी तिने जरांगेंसमोर रडत रडत आपली समस्या मांडली होती.  (caste validitiy certificate issue student cry infront of manoj jarange maratha reservation) 
 
आंतरवाली सराटी येथे आजपासून पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान, त्यांच्या व्यासपिठासमोर येऊन एका मुलीने सरकारकडून काढल्या जाणारे जीआर आणि त्याचा आम्हा मुलांना प्रवेशासाठी होणाऱ्या त्रासाची आपबीती सांगितली. 

हे वाचलं का?

यावेळी व्यासपीठावरून बोलताना विद्यार्थीनी म्हणाली की, आम्ही जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढायचे आहे. शासनाच्या वतीने 28 जून रोजी एक जीआर आला. त्यात कास्ट प्रमाणपत्र आणि एनसीएल लागते, याची अट घातली गेली. त्यानंतर पुन्हा 5 जुलै रोजी दुसरा जीआर आला जात प्रमाणपत्र व एनसीएल हे स्वतंत्र पानावर लागेल. तर 14 जुलै रोजी पुन्हा तिसरा जीआर काढला गेला, त्यात जात प्रमाणपत्र व एनसीएल हे स्वतंत्र पानावर नसले तरी चालेल.

हे ही वाचा : Prakash Ambedkar : आधी जरांगेंना पाठिंबा आता विरोध, आंबेडकरांच्या यात्रेचा अर्थ काय?

सरकारच्या या आडमुठ्या जीआर प्रणालीमुळे अडचणीत आलो आहे. कास्ट व्हॅलिडिटी आम्ही कशी काढायची? ऑनलाईन करायला जावे तर त्यात सर्व्हर डाऊन आहे. दुसरीकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणली पण त्यात आमचं किती नुकसान होत आहे. तहसीलमध्ये जावे तर कर्मचारी संपावर, कोणी आम्हाला नीट सांगत देखील नाही, असे म्हणत सदर विद्यार्थीनीने रोष व्यक्त केला. तर ही सर्व परिस्थिती सांगताना ही ढसाढसा रडायला लागली.

आमचे आई पप्पा एक लाख फीस देऊ शकत नाही. शिक्षणासाठी सरकारने असा निर्णय का घेतला? मला दहा टक्के आरक्षण आहे तर आम्हाला लागूच करू देत नाही. दहा दिवसात सर्टिफिकेट कसं मिळायचं, पावतीवर रजिस्ट्रेशन करायला सांगत आहे, आम्हाला पावती पण भेटत नाही. आमचे ews का बंद केलेत? इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन साठी चार दिवस बाकी आहेत आम्हाला वेळ वाढवून द्या, अशी मागणी देखील या तरूणीने केली. 

हे ही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : "सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय?", काँग्रेसचे साँग, महायुतीवर वार

दरम्यान सरकारने मुलींना मोफत शिक्षण केले, या निर्णयाचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्वागत केलंय. सरकारने मुलींची फी माफ केलीय, मात्र ज्या पोरांच्या फिस संस्था चालकांनी भरून घेतल्या आहेत, त्या परत द्यायला लावा अशा सूचना जरांगे यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. अध्यादेशात काही दुरुस्त्या असतील तर त्या आम्ही सरकारला वाचून कळवू असं जरांगे म्हणालेत. 50 टक्के फिस आपण कोणत्या विद्यार्थ्यांकडून मागताय याच सरकारने स्पष्टीकरण द्यावं असं जरांगे म्हणालेत. दरम्यान सरकारने जारी केलेल्या अध्यादेशात काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या सरकार ने भरून काढाव्यात असं ही जरांगे म्हणालेत. 
 

    follow whatsapp