Maratha Morcha : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, शिंदे-पवारांचा मोठा निर्णय

मुंबई तक

13 Sep 2023 (अपडेटेड: 13 Sep 2023, 08:39 AM)

Maratha Morcha : आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटीला जाणार आहेत. त्यामुळे आजच्या जरांगे-पाटील आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या भेटीकडे लक्ष लागून राहिले आहे.

Eknath shinde ajit pawar Maratha mocrha

Eknath shinde ajit pawar Maratha mocrha

follow google news

Maratha Morcha : ऑगस्ट महिन्याच्या 29 तारखेपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या असल्या तरी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जर भेटायला आले तर चर्चा करुन मी उपोषण सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भेटीला जाणार आहेत. त्यामुळे आजच्या जरांगे-पाटील आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या भेटीकडे लक्ष लागून राहिले आहे.

हे वाचलं का?

मध्यस्थीनंतर थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री भेटीला

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावे अशी इच्छा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सरकारतर्फे राजकीय नेत्यांनी मध्यस्थी करत जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र जरांगे पाटील यांनी सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देत त्याबाबतचा अध्यादेश काढावा त्यानंतर आपण उपोषण मागे घेणार असल्याचे सांगितले होते.

हे ही वाचा >> India Alliance : ‘या’ 13 गोष्टी ठरवणार ‘इंडिया’चं भवितव्य, आता खरी कसोटी!

आरक्षणावर चर्चा होणार

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री चर्चेला आले तर आपण उपोषण थांबवून त्याबाबत चर्चा करू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मराठा आरक्षणाविषयी आता नेमका काय निर्णय होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा >> Yashomati Thakur : ‘तू चोट्टा, तुझी बायको चोट्टी’ त्या आरोपावर यशोमती ठाकुर राणांवर भडकल्या

जरांगे-पाटलांकडून स्वागत

एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज सायंकाळी पाच वाजता अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आता सरकार काय निर्णय देणार हे आता कळणार आहे. शिंदे-पवार भेटीला येणार असल्याचे समजल्यानंतर जरांगे पाटील यांनीही दोन्ही मंत्र्यांचे स्वागत करुन चर्चा करु असं मतही त्यांनी व्यक्त केले.

    follow whatsapp