टॉयलेटच्या फ्लशमध्ये दोन बटण का असतात? 99 टक्के लोक चुकीचं बटण दाबतात, करेक्ट बटण कोणतं?

Why Toilet Flush Has 2 Buttons : टॉयलेटच्या फ्लशमध्ये दोन बटण का असतात? या प्रश्नाचं उत्तर अनेक लोकांना माहित नसावं. खरंतर टॉयलेटच्या फ्लशमध्ये लावलेले दोन बटण वेगवेगळ्या कामांसाठी असतात.

Why Toilet Flush Has 2 Buttons

Why Toilet Flush Has 2 Buttons

मुंबई तक

• 09:37 PM • 07 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

टॉयलेटच्या फ्लशमध्ये असतो छोटा बटण-मोठा बटण

point

ड्युअल फ्लश सिस्टम काय असतं?

point

रिसर्च काय सांगतं?

Why Toilet Flush Has 2 Buttons : टॉयलेटच्या फ्लशमध्ये दोन बटण का असतात? या प्रश्नाचं उत्तर अनेक लोकांना माहित नसावं. खरंतर टॉयलेटच्या फ्लशमध्ये लावलेले दोन बटण वेगवेगळ्या कामांसाठी असतात. परंतु, या बटणांचा योग्य वापर न केल्याने खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. हे दोन्ही बटण एकसारखेच असतात, असंच अनेकांना वाटतं.

हे वाचलं का?

पण तसं नाहीय. हे दोन्ही बटण ड्युअल फ्लश सिस्टमचा भाग आहेत. पाण्याची बचत होण्यासाठी अशाप्रकारचे बटण डिझाईन केले गेले आहेत. टॉयलेटच्या फ्लशमध्ये दोन बटण असतात. एक बटण हाफ फ्लश असतो आणि एक बटण फुल फ्लशसाठी असतो. योग्य माहिती नसल्याने लोक नेहमी फुल फ्लशचा बटण दाबतात. ज्यामुळे प्रत्येक दिवशी हजारो लीटर पाणी वाया जातं.

छोटा बटण-मोठा बटण

माहितीसाठी, छोटा बटण हाफ फ्लशसाठी असतो. ज्याचा उपयोग फक्त लघवी केल्यानंतर केला पाहिजे. यासाठी जवळपास 3 लीटर पाणी लागतं. तर मोठा बटण फुल फ्लशसाठी असतो. याचा उपयोग टॉयलेट केल्यानंतर केला पाहिजे. यासाठी जवळपास 6 लिटर पाण्याची आवश्यकता लागते.

हे ही वाचा >> HSC Result 2025 : कधी लागणार बारावीचा निकाल? महत्त्वाची अपडेट आली समोर

रिसर्च काय सांगतं?

90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना या दोन्ही बटणांमधील फरक माहित नाही. ते प्रत्येक वेळी फुल फ्लशचाच वापर करतात. यासाठी एक व्यक्तीकडून दररोज 10-15 लीटर अतिरिक्त पाणी खर्च होतं. एका कुटुंबात चार सदस्य असतील आणि ते दिवसातून पाचवेळा टॉयलेटचा वापर करत असतील, त्यांनी जर फुल फ्लशचा वापर केला, तर 120 लिटर पाणी फक्त टॉयलेटसाठी वापरलेलं असेल. जर योग्य पद्धतीत हाफ आणि फुल फ्लशचा वापर केला, तर पाण्याची योग्य बचत होईल.

हे ही वाचा >> पुण्यात खळबळ, शीर कापलं, तळहात आणि पायही कापून फेकले अन्... हादरवून टाकणारं प्रकरण तरी काय?

ड्युअल फ्लश सिस्टम

1980 च्या दशकात ड्युअल फ्लश सिस्टमची सुरुवात ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. घरगुती वापरात पाण्याची बचत करणं, हे यामागचं उद्देश होतं. आता हे सिस्टम भारतासह अनेक देशात लोकप्रिय झाला आहे. 

    follow whatsapp